श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव

Shri Gajanan Maharaj
Shri Gajanan MaharajShri Gajanan Maharaj

शेगाव (जि. बुलडाणा) : महाराष्ट्रासह देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत गजानन महाराजांचे मंदिर घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर पुन्हा खुले झाले. कोरोनामुळे राज्यातील सर्व मंदिर बंद असल्याने शेगावचे धार्मिक पर्यटनही थांबले होते. आता या पर्यटनाला परत चालना मिळणार असून, शेगावात भाविकांची झुंबड दिसणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराजांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधिस्थळावर भव्य मंदिर बांधले गेले आहे. त्याची व्यवस्था येथील गजानन महाराज संस्थान पाहते. श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिर मध्यभागी समोरच दोन भव्य प्रवेशव्दारे आहेत. श्रींचे समाधी मंदिर अत्यंत आकर्षक अशा संगमरवरी बांधणीतून घडविलेले आहे. थेट दर्शन तसेच श्री मुखदर्शनाव्दारे भक्तजनांना आराध्य दैवताचे अलौकिक रूप पाहता येते. गाभाऱ्यासमोरील प्रशस्त, मोकळ्या जागेतून श्री गजानन महाराजांचे ‘डोळा भरून’ दर्शन घेता येते.

श्रींचे दर्शन घेऊन भुयारातून भक्त श्रीराम मंदिरात प्रवेश करतात, अशी रचना करण्यामागे एक विशिष्ट हेतू आहे. संतांकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भुयारातून बाहेर पडल्यावर श्री गजानन महाराज संजीवन समाधी स्थानाच्या वरील बाजूस सुवर्णमयी प्रभावळीतून साकारलेल्या श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र, सीतामाई व लक्ष्मण यांच्या संगमरवरी आकर्षक व विलोभनीय मूर्तीचे दर्शन होते. या मंदिराचे प्रवेशव्दार तसेच गाभाऱ्यातील काही भाग सुवर्णपत्र्याने मढविलेला आहे. येथेच श्रींच्या नित्य वापरातील पादुका तसेच चांदीचे मुखवटेही आहेत. हे चांदीचे मुखवटे  श्रींच्या पालखी सोहळ्यामध्ये भक्तदर्शनार्थ ठेवले जातात.

Shri Gajanan Maharaj
सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

२३ फेब्रुवारी १८७८ रोजी श्रींचे प्रथम दर्शन

२३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी श्री गजानन महाराजांचे प्रथम दर्शन शेगाववासीयांना घडले. हा दिवस श्रींचा प्रगटदिनोत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवप्रसंगी माघ वद्य १ ते ७ श्रीं महारुद्र स्वाहाकाराचे आयोजन करण्यात येते. यागाची पूर्णाहुती व अवभृत स्नान सकाळी १० वाजता होते. दुपारी १० ते १२ श्री प्रगटदिनोत्सवाचे कीर्तन होऊन दुपारी १२ वाजता श्रींचा प्रगटदिनोत्सव साजरा करण्यात येतो.

सभामंडप

श्रींच्या समाधीचे दर्शन घेऊन पायऱ्या चढून वर येताच पाषाणातून कोरलेल्या कलाकुसरयुक्त नक्षीदार कमानी आणि डौलदार खांबांवर साकारलेल्या भव्य सभामंडपात  श्री गजानन विजय ग्रंथातातील श्रींचे विविध लीला प्रसंग चित्ररूपाने साकारलेले दिसतात. पूर्वीच्या दगडाच्या खांबावर रंग चढवल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात. याच सभामंडपात श्रीराम मंदिर तसेच दासमारुतीचे छोटे परंतु आकर्षक मंदिर दृष्टीस पडते.

श्रीराम जन्मोत्सव

श्रीराम नवमीनिमित्त मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. या उत्सवाप्रसंगी चैत्र शु. १ ते ९ पावेतो उत्सवात चैत्र शु. ५ ते ९ श्री अध्यात्म रामायण स्वाहाकाराचे आयोजन करण्यात येते. सकाळी १० ते दुपारी १२ श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होऊन दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो.

श्री पुण्यतिथी

भाद्रपद शु. पंचमी, श्री ऋषीपंचमी शके १८३२, अर्थात ८ सप्टेंबर १९१० या दिवशी श्रींनी संजीवन समाधी ग्रहण केली. हा दिवस श्रींचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाप्रसंगी भाद्रपद शु. १ ते ५ श्रींच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये श्री गणेशयाग व वरुणयागाचे आयोजन करण्यात येते.

असे पडले शेगाव हे नाव

प्राचीन काळी श्रृंगमुनींनी वसविल्यामुळे श्रृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील सुप्रसिद्ध शिवमंदिरामुळे या गावास शिवगाव असेही म्हणत. या शिवगावाचे पुढे शेगाव असे नामकरण झाले. शेगाव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जाते श्री गजानन महाराजांच्या पावन वास्तव्यामुळे.

Shri Gajanan Maharaj
चुलत जावांचा शॉक लागून मृत्यू; भेटीसाठी गेली अन् गमावला जीव

मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर ‘ब’ वर्गाचे स्टेशन

शेगाव हे तीर्थक्षेत्र मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर मार्गावर ‘ब’ वर्गाचे स्टेशन आहे. ओखापुरी, तेरणा आणि डिलक्स (ज्ञानेश्वरी) आदींसारख्या काही अतिजलद लांब पल्याच्या गाड्या वगळता इतर सर्व रेल्वे गाड्या येथे थांबतात. तसेच शेगावपासून ५ तासांच्या अंतरावर नागपूर व औरंगाबाद ही विमानतळे आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातच संस्थानचे चौकशी कक्ष असून, भक्तांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते. स्टेशन परिसरात संस्थानच्या सेवार्थ बसेस उपलब्ध असतात. स्टेशनपासून मंदिराचे अंतर अवघे ५ फर्लांगाचे असून केवळ दहा मिनिटांचाच हा पायदळ रस्ता आहे. मंदिराच्या रस्त्यानेच एसटी स्टॅण्ड आहे. तसेच दक्षिणेस शेगावपासून १६ कि.मी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ आहे. संतनगरी शेगाव हे आंतरराज्य परिवहन मंडळाच्या गुजरात व मध्यप्रदेशशी बसेसव्दारा जोडलेले आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुसंख्य नगरे व तीर्थस्थाने बसेसने शेगावशी जोडली गेलेली आहेत.

निवास व्यवस्था

संस्थानाच्या ‘भक्त निवास’मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तेथे ७०० खोल्यांची व्यवस्था असून, गर्दीच्या वेळेस त्याव्यतिरिक्त ५,००० बिछाने देखील पुरविण्यात येतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे. ‘आनंद सागर विसावा’ येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.

शेगावला येण्याचे मार्ग -

हवाई मार्ग :-  दिल्ली- मुंबई-औरंगाबाद, बंगलोर-मुंबई-औरंगाबाद

(सर्वांत जवळचे विमानतळ) येथून शेगाव २२५ किमी असून औरंगाबादवरून रस्त्याने ४ तासांचा प्रवास आहे. 

दिल्ली-नागपूर, चेन्नई-नागपूर आणि कोलकाता-नागपूर या मार्गे शेगाव ३०० किमी आहे. नागपूरपासून रस्त्याने सहा तासांचा प्रवास आहे आणि रेल्वेप्रवास ४.३० तासांचा आहे. 

रेल्वे मार्ग :-  दिल्ली-भुसावळ आणि बंगलोर-भुसावळ या मार्गे शेगाव भुसावळवरून १२० किमी असून रोड व रेल्वेने तीन तासांचा प्रवास आहे.

मुंबई-भुसावळ-शेगाव नागपूरकडे

कोलकाता-मुंबई-भुसावळ-शेगाव (नागपूरकडे)

चेन्नई-नागपूर-शेगाव (मुंबई/अहमदाबादकडे)

रस्ता मार्ग :- भुसावळ-शेगाव (१२० किमी ३ तासांचा प्रवास)

औरंगाबाद-शेगाव (२२५ किमी ४ तासांचा प्रवास)

नागपूर-शेगांव (३०० किमी ६ तासांचा प्रवास)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com