चला भेट देऊया पूर्वेचे ‘स्कॉटलँड’ म्हणजे शिलाँगला

चला भेट देऊया पूर्वेचे ‘स्कॉटलँड’ म्हणजे शिलाँगला

नागपूर : आपल्यापैकी अनेकांना बाहेर फिरायला जायला आवडत असेल. पर्यटन हा अनेकांचा आवडीचा विषय असतो. कोणी उन्हाळ्यात, कोणी पावसाळ्यात तर कोणी हिवाळ्यात बाहेर फिरायला जात असतात. आपल्या सोयीनुसार प्रत्येकजन नियोजन आखत असतो. कमी दिवसांसाठीच का होईना प्रत्येकजन फिरायला जात असतो. यंदा तुम्ही फिरायला जाण्याचा बेत आखला असेल तर शिलाँगला नक्की भेट द्या. (shillong-Tourism-Best-places-Meghalaya-Many-fascinating-things-nad86)

शिलाँग हे देवदारच्या झाडांनी व्यापलेले चांगले हिल स्टेशन आहे. ते आपल्या सुंदरता, विरासत, परंपरेसाठी ओळखले जाते. येथील आकर्षक सौंदर्य, आजूबाजूच्या पहाडांमुळे या ठिकाणामुळे ‘पूर्वचं स्कॉटलँड’ म्हणून ओळखले जाते. शिलाँग हे मेघालय राज्याची राजधानी आहे. शिलाँगमध्ये बरीच पर्यटन स्थळे आहेत. यामुळे हे शहर विशेष बनले आहे. नद्या, प्राणिसंग्रहालय, संग्रहालये, ट्रेक पॉइंट्स, धबधबे आदी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. जर तुम्हाला नैसर्गिक चमत्कार जवळून जाणून घ्यायचे असतील तर या ठिकाणी नक्की भेट द्या...

चला भेट देऊया पूर्वेचे ‘स्कॉटलँड’ म्हणजे शिलाँगला
दर १० मिनिटाला हलतो पाळणा, वर्षाला ५० हजार दाम्पत्याकडे ‘गुड न्यूज'

राज्य संग्रहालय

स्टेट संग्रहालय हे कॅप्टन विल्यमसन संगमा स्टेट म्युझियम म्हणून ओळखले जाते. हे या प्रदेशातील सांस्कृतिक विविधतेचा अनुभव घेण्यासाठी उत्तम पर्यटन स्थळ आहे. संग्रहालयात पारंपरिक वाद्ये, डायनासोर मॉडेल, पुरातन वस्तू, दागिने आदी ठेवलेले आहेत. हे संग्रहालय परिसरातील संस्कृती आणि इतिहासाच्या अभ्यासाचे महत्त्वपूर्ण केंद्र आहे.

उमियम लेक

मेघालयातील सर्वांत प्रसिद्ध स्थळांपैकी उमियम लेक हे वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळ आहे. हे जलाशय १९६०च्या दशकात उमियम नदीवर बांधले गेले होते. तेव्हापासून ते पर्यटकांचे आकर्षण आहे. येथील निळसर पाणी तलावाचे सौंदर्य खरोखरच मंत्रमुग्ध करते. आपण येथे नौकाविहार, जलपर्यटन आदींचा आनंद घेऊ शकता.

डॉन बॉस्को संग्रहालय

आदिवासी संस्कृती आणि मेघालयातील सांस्कृतिक इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी डॉन बॉस्को संग्रहालय उत्तम ठिकाण आहे. संग्रहालयात देशी लिखाण आणि कलाकृतींचा प्रभावी संग्रह आहे. या संग्रहालयात सात मजले आणि १७ गॅलरी आहेत. येथे तुम्हाला प्रादेशिक कलाकृती, वेशभूषा, हस्तकला आदी मौल्यवान वस्तू दिसतील. डॉन बॉस्को संग्रहालय हे देशातील स्थानिक संस्कृतींचे आशिया खंडातील सर्वांत मोठे संग्रहालय समजले जाते.

चला भेट देऊया पूर्वेचे ‘स्कॉटलँड’ म्हणजे शिलाँगला
अमानुष प्रकार! चौथीच्या विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा

एलीफेंट फॉल्स

कुटुंब किंवा मित्रांसह सहलीचा आनंद घेण्यासाठी हे सर्वोत्तम स्थान आहे. या धबधब्याखाली मोठा खडक आहे. तो अगदी हत्तीप्रमाणे दिसतो. या कारणास्तव या जागेला एलिफंट फॉल्स असे नाव दिले आहे. त्यातून तीन लहान धबधबे निघतात हे विशेष. या ठिकाणाहून येणारा पाण्याचा आवाज तुमच्या कानाला आराम देते.

पोलिस बाजार

तुम्हाला रस्त्यावर खरेदी करायला आवडत असेल तर मेघालयातील पोलिस बाजाराला नक्की भेट द्या. स्थानिक पाककृतीचा आनंद घ्यायचा असेल तरी हे ठिकाण उत्तम आहे. येथून तुम्ही पारंपरिक शिलाँग कपडे आणि पोशाख खरेदी करू शकात. विश्वसनीय हस्तकला, ​​घरगुती वस्तू, मसाले, सजावटीच्या वस्तू कमी किमतीत मिळवण्यासाठी पोलिस बाजारला अवश्य भेट द्या.

(shillong-Tourism-Best-places-Meghalaya-Many-fascinating-things-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com