मुस्लिम संस्थाचालकातर्फे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा

एल. बी. चौधरी
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

एका मुस्लिम संस्थाचालकाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे. 

सोनगीर (जिल्हा धुळे) : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सवाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच पर्यावरणाचे जतन व्हावे म्हणून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणपती बनविण्याचे प्रशिक्षण किनो एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रईस शेख यांनी आयोजित केले. एका मुस्लिम संस्थाचालकाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले आहे. 

मालेगाव (सोयगाव) कलेक्टर पट्टा येथील उज्ज्वल प्राथमिक शाळेत इकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  शाडूमातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कशी बनवावी याचे कृतीयुक्त मार्गदर्शन मूर्तिकार श्याम  शिंपी यांनी विद्यार्थ्यांना केले.  शाडूमातीपासून बनवलेल्या मूर्तीमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही . पर्यावरणाची कुठलीही हानी होत नाही. याचे महत्व  शिंपी यांनी पटवून दिले. शाळेने विद्यार्थ्यांना शाडू माती पुरवली.

यावेळी मुख्याद्यापिका अर्चना गरुड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, किनो एजुकॅशन संस्थेचे अध्यक्ष रईस शेख यांनी विध्यार्थ्यांना उत्सवांचे महत्त्व व पर्यावरण यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वाती पाटील, सुम्मया पटेल, स्वाती अहिरे, संगीता गायकवाड, अर्चना पगारे, अमोल ठोके, अभिजित अहिरे, राहुल केदारे, प्रवीण काकलीज, योगेश बच्छाव, दिवेश बोरसे आदींनी परिश्रम घेतले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
फासावर जाईन, पण भाजपशी समझोता नाही- लालू प्रसाद यादव
पुणे: नारायणगावजवळ एसटीला अपघात; 8 जणांचा मृत्यू
तिसऱ्या सामन्यासह भारताचा मालिका विजय
सिंधूचे सुवर्ण स्वप्नभंग
शिवसेनेच्या नाराजांना मुख्यमंत्र्यांचे 'गाजर'
भाजप म्हणजे खरेदी-विक्री संघ! - अशोक चव्हाण
'कह दू तुम्हें' वापरण्यास बादशाहोला अंतरिम मनाई