गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नाशिक - गणेशोत्सवाच्या  सहाव्या दिवशी देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक मंडळांनी पर्यावरणपूरक देखावे साकारले असून, यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातोय. आजही गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याने मंडळाचे स्वयंसेवक सुखावले होते. 

दिवसभर पावसाच्या रिमझिम धारा अधूनमधून बरसत होत्या. सायंकाळीही पाऊस बरसेल व त्याचा परिणाम गर्दीवर होईल, असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सायंकाळी पावसाने घेतलेल्या विश्रांतीने भाविकांना बाप्पाच्या दर्शनाची संधी दिली. नाशिककरांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडत विविध मंडळांनी साकारलेले देखावे पाहिले. मित्र-नातेवाइकांकडे गौरी- गणपती दर्शनासाठी सहकुटुंब बाहेर पडताना सोबत विविध ठिकाणी फेरफटका मारत देखाव्यांची अनुभूती घेतली. गणेशोत्सव अंतिम टप्यात येत असताना पुढील दोन-चार दिवसांत विक्रमी गर्दी होईल, असा अंदाज व्यक्‍त होत आहे.