नाशिककर रस्त्याच्या दुतर्फा गणरायाच्या दर्शनासाठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

नाशिक : गणरायाला निरोप देण्यासाठी आज दुपारी साडेबारा पासून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. वाकडी बारव पासून निघालेला महापालिकेचा गणेश रविवार कारंजा पर्यंत पोचला आहे. 

दुसरे रविवार कारंजा मंडळ अशोक स्तम्ब जवळ आहे. तिसरे गुलालवाडी मंडळ मेहेर सिग्नल ला आहे. बाप्पा च्या दर्शनासाठी नाशिककर रस्ताच्या दुतर्फा पोचले आहेत.

नाशिकचा ढोल हे मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. 18 मंडळांनी सहभाग नोंदविला आहे. मिरवणूक रात्री 12 पर्यंत पूर्ण होईल अशी स्थिती सध्यातरी आहे. वरद विनायक, शिवराय, माऊली, शिवनाद, शिवसंस्कृती, गुलालवाडी, विघनहरण, रामनगरी, तालरुद्र ढोल पथकांनी मिरवणूक रंगतदार केलीय.