बारा वर्षांपासून फरारी  "एलसीबी'च्या जाळ्यात 

बारा वर्षांपासून फरारी  "एलसीबी'च्या जाळ्यात 

बारा वर्षांपासून फरारी 
"एलसीबी'च्या जाळ्यात 

जळगाव : साकेगाव (ता. भुसावळ) येथील दारू विक्रेता आकाश शिवा उपासे या दारू विक्रेत्याचा थर्टीफस्टच्या रात्री (31 डिसेंबर 2009) चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. खुनानंतर तालुका पोलिसांनी तीन सख्ख्या भावांसह चुलत्याला गुन्ह्यात अटक केली होती. न्यायालयात खटला चालून इतर तिघे पुराव्याअभावी निर्दोष सुटले तर जितेंद्र श्रावण जावळे (वय 51) याला सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना बारा वर्षांपूर्वी पॅरोलवर सुटल्यानंतर जितेंद्रने गाव सोडत वेशांतर करून नागपूरला दुसरा संसार थाटला होता. गुप्त माहितीच्या आधारे तब्बल एक महिना मागोवा घेऊन गुन्हेशाखेच्या पथकाने संशयिताला अटक केली 
नातेवाईक, गावकऱ्यांमध्ये जितेंद्र नागपूरला गेला व तेथेच त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली होती. मात्र, गुन्हेशाखा निरीक्षक सुनील कुराडे यांच्या गुप्त माहितीवरून जावळेचा नागपुरात शोध सुरू करण्यात आला. 
मृत्यूची कुठलीच अधिकृत नोंद नसल्याने गुन्हेशाखेच्या पथकातील अनिल इंगळे, नुरुरोद्दीन शेख, संतोष मायकल, अनिल देशमुख गफूर तडवी यांच्या पथकाने नागपूर गाठत तब्बल महिनाभर शोध चालवला. अखेर पेरलेल्या खबऱ्याने घर दाखविल्यावर पथकही गोंधळले. पोलिसी खाक्‍या दाखवताच जितेंद्र जावळेच्या भांडाफोड होऊन तत्काळ अटक करून जळगावात आणण्यात आले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com