इगतपुरी तालुक्याचा बारावीचा निकाल ८४.३० टक्के

विजय पगारे
गुरुवार, 31 मे 2018

इगतपुरी : तालुक्यातील 12 वी च्या परीक्षेच्या ऑनलाईन निकाल आज  दुपारी १ वाजता जाहीर झाला .इगतपुरी तालुक्याच्या निकाल आज स्पर्धात्मक दृष्ट्या समाधानकारक असून त्यात इगतपुरीच्या वंडरलँड इंग्लिश मेडीयम उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर घोटी येथील आदर्श कन्या विद्यालय, इगतपुरीची एमजी हायस्कूल, इगतपुरी जनता विद्यालय, जनता विद्यालय घोटी या शाळांनी 90 टक्केच्या वर निकालाची टक्केवारी मिळऊन ग्रेड श्रेणीत निकाल लावून शाळेचा आदर्श कायम ठेवला.

इगतपुरी : तालुक्यातील 12 वी च्या परीक्षेच्या ऑनलाईन निकाल आज  दुपारी १ वाजता जाहीर झाला .इगतपुरी तालुक्याच्या निकाल आज स्पर्धात्मक दृष्ट्या समाधानकारक असून त्यात इगतपुरीच्या वंडरलँड इंग्लिश मेडीयम उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर घोटी येथील आदर्श कन्या विद्यालय, इगतपुरीची एमजी हायस्कूल, इगतपुरी जनता विद्यालय, जनता विद्यालय घोटी या शाळांनी 90 टक्केच्या वर निकालाची टक्केवारी मिळऊन ग्रेड श्रेणीत निकाल लावून शाळेचा आदर्श कायम ठेवला. तर उर्वरित शाळांनी समाधानकारक निकाल लावला असून, इगतपुरी तालुक्यातील सर्व केंद्राचा निकाल ८४.३० % लागल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 

गत वर्षांच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात निकालाने सहा टक्के वाढ झाली आहे इगतपुरी तालुक्यात १५ केंद्रावर १२ वीची परीक्षा घेण्यात आली , त्यात आज २ हजार ३०२ विद्यार्थी व विद्यार्थिनी परीक्षा दिली होती ,त्यात
विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले , यावरून तालुक्याचा सरासरी निकाल ८४.३० % लागल्याची नोंद आहे .त्यात इगतपुरी येथील जनता विद्यालय इगतपुरी 97 टक्के तर वंडरलँड उच्च माध्यमिक विद्यालय इगतपुरी या इंग्रजी माध्यमच्या शाळेचा १०० % निकाल लागला असून ,घोटी येथील आदर्श कन्या विद्यालयानेही ९८ टक्के तर महात्मा गांधी उच्च महाविद्यालयात ९० निकाल लावून आपल्या शाळेच्या निकालाची परंपरा कायम ठेवली.

इगतपुरी तालुक्यातील उर्वरित केंद्राचा निकाल पुढील प्रमाणे ( कंसात निकालाची टक्केवारी) : आदर्श कन्या  महाविद्यालय घोटी(९७.७५), व्ही एन पाटील उच्च माध्यमिक विद्यालय इगतपुरी (८७.०३), महात्मा गांधी हायस्कूल इगतपुरी (९०.२१), न्यू इंग्लिश स्कूल कवडदरा (८१.४८) श्री भैरवनाथ उच्च माध्यमिक विद्यालय खेड (७०.१४ ),न्यू इंग्लिश स्कूल टाकेद (७७.३२ ) ,न्यू इंग्लिश स्कूल आहुर्ली (८३ ), श्री सिद्धी विनायक माध्यमिक विद्यालय गोंदे दुमाला (८९ ) , जनता विद्यालय उच्च माध्यमिक घोटी (८७.३९ ), कर्मवीर पुजाबाब गोवर्धने महाविद्यालय इगतपुरी (७९.८७) व न्यू इंग्लिश स्कूल वाघेरे ( ८८.८८ ), माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वाडीवऱ्हे(७१.४२ )टक्के निकाल लागला आहे.तर घोटी येथील सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल (७४.५०) लागला असून या महाविद्यालयाने विज्ञान शाखेत १०० टक्के यश मिळविले आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेत १०० टक्के निकालापर्यंत जाण्याचा प्रयत्न तीन चार
शाळांनी केला त्यात वंडरलँड शाळेने १०० टक्के यश मिळविले आहे.

Web Title: 12th result of igatpuri tehsil is 84.30 percent

टॅग्स