महापालिकेला स्मार्टसिटीसाठी 135 कोटींचा निधी प्राप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

नाशिक - स्मार्टसिटीसाठी महापालिकेला केंद्र सरकारकडून नव्वद कोटी, तर राज्य सरकारकडून 45 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. महापालिकेने स्वहिस्सा पन्नास कोटी देण्याचा निर्णय घेतला असून, याप्रमाणे स्मार्टसिटीतील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी 185 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. केंद्राकडून दहा, तर राज्य सरकारचे पाच कोटी असे पंधरा कोटी रुपये लवकरच प्राप्त होणार असल्याने स्मार्टसिटी निधी दोनशे कोटी रुपये जमा होईल. 

केंद्र सरकारने नाशिक महापालिकेचा समावेश स्मार्टसिटीमध्ये केला. ग्रीन फील्ड, रेट्रोफिटिंग व पॅनसिटी या तीन प्रकारांत नाशिक स्मार्टसिटी निर्माण केली जाणार आहे. त्यासाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला. केंद्र सरकारकडून पाच वर्षांत पाचशे कोटी, राज्य सरकारकडून अडीचशे कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. उर्वरित रक्कम महापालिका स्वनिधीतून देणार आहे. स्मार्टसिटीसाठी स्पेशल पर्पज व्हेइकल कंपनीची स्थापना करण्यात आली. तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे. पुढील आर्थिक वर्षापासून नियोजनानुसार प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत. महापालिकेने प्रथम पॅनसिटी प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत ऑनलाइन सुविधा, क्रेडिट कार्डद्वारे करभरणा आदी संगणकीय आधारित सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टसिटी प्रकल्पांना चालना देण्याचा मार्ग शासनाकडून निधी प्राप्त झाल्याने मोकळा झाला आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होत असताना त्यापूर्वी महापालिकेच्या तिजोरीत रक्कम जमा झाली आहे. 

Web Title: 135 crore received funding for smartcity