साठ क्रेट्स टोमॅटो विक्रीतून आले वजा चारशे बत्तीस रुपये

tomato
tomato

तळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या तीन ते चार महिन्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, आत्ता तर चक्क टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडीभाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ टोमॅटो  उत्पादक शेतकऱ्यावर आली असून उन्हातान्हात काबाडकष्ट करून पिकवलेला माल विक्रीसाठी नेल्यावर आपल्यालाच खिशातून भाडे भरावे लागत आहे.

त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून टोमॅटो आता १ ते २ रुपये किलो इतका घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. रोजच्या जेवणात महत्वाचे स्थान असणाऱ्या टोमॅटोचे भाव घसरल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर्षी टोमॅटा पिकाला सुरूवातीपासूनच चांगला भाव नाही. संपूर्ण हंगामभर भावाची घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अडचणीत आला आहे. व्यापारी टोमॅटो उत्पादकास बाजारात २० किलो टोमॅटोच्या क्रेटला प्रतवारीनुसार ४० ते ५० रूपये दर देत असल्यान शेतकऱ्यांना मजूरीचे पैसेही हातात येत नाही.

तळवाडे दिगर येथील एका  या शेतकऱ्याने ६० (जाळी) क्यारेट टोमॅटो  सुरत येथे पाठवला असता त्यांना वजा ४३२ रुपयांची पट्टी आली असून गाडी  भाडे देखील निघाले नसून त्यांना टोमँटो  सुरत पर्यंत पाठवण्यासाठी लागणारे भाडयाचे पैसे देखील आपल्या खिशातून भरण्याची वेळ आली असून,त्याच बरोबर तोडणीचा खर्च (१५ रुपये क्रेटस) देखील घरातून भरण्याची वेळ त्याच्यावर आली असून सुरत येथे पाठवण्यासाठी प्रती  क्रेटस ४९  रुपये भाडे,९० रुपये हमाली,तोलाई हमाली १३१  गेली असता टोमँटो विक्रीची पावती वजा ४३२ रुपये अशी आल्याने शेतकरी अवघा हवालदिल झाला आहे. एकरी एक ते सव्वा लाख खर्च केलेल्या शेतात अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावर टाँकट्टर फिरवायला सुरुवात केली आहे. तर काही शेतकऱ्यांनी उभ्या पिकात शेळ्या,मेंढ्या घालायला सुरुवात केली आहे.

टोमॅटो पिकासाठी एकरी एक लाख ते सव्वालाख रुपये खर्च करून हातात एक रुपया पण पडत नसून उलट घरातू पैसे घालण्याची वेळ उत्पादक शेतकरी वर्गावर आलेली आहे. टोमॅटोसाठी शेतीची मशागत,ठिबक,मल्चिंग पेपर,खत,औषध,मंडपासाठी तार,बांबू,सुतळी,बांधणी,तोडणी (काढणी )मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर एकरी लाख रुपये खर्च करूनही हातात मात्र कोऱ्या पावत्या पडत असून शेतकरीमेटाकुटीला आला आहे.

शेतकऱ्याचा माल शेतात तयार झाल्यावर सुध्दा तो व्यापारी वर्ग बाजारात आणण्यासाठी तोडणी, क्रेटभरणे, वाहतुक या सर्व बाबींचा खर्च शेतकऱ्यास करावा लागतो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च यांची गोळा बेरीज केली तर आजच्या भावात उत्पादक शेतकऱ्याकस टोमॅटो पीक न परवडण्यासाखे आहे. चालू वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वरील नगदी पिकांवर शेतकरऱ्यांतची मदार जास्त होती. पण भावामुळे शेतकऱ्यांची ही आशा सुध्दा फोल ठरली.

टोमॅटो या नगदी पिकास भाव मिळेल हे स्वप्न भंगले. टोमॅटो हे पीक नासवंत आहे. त्यामुळे मालाचासाठा सुध्दा करता येत नाही. माल सडू नये, म्हणून मिळालेल्या भावात शेतकरी आपला माल कमिशन एजंटकडे विकतांना दिसत आहे. मात्र अशी परीस्थिती असतांना शहरातील बाजारपेठेत मात्र हातविक्रीला टोमॅटो १५ ते १८ रुपये प्रतिकिलो दराने ग्राहकाला खरेदी करावा लागत असून मग शेतकऱ्याकडूच का २ ते ३ रुपये किलो दराने खरेदी केला जातो असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

सध्या ऐन उन्हाळा सुरु असून सर्व भाजीपाला पिकांची हीच परिस्थिती असून टोमँटो, मिरची, कांदा, कोबी, फ्लावर, टरबूज, काकडी आदी पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अशक्य झाले असून शेतकऱ्यांच्या हातात चिल्लर सुद्धा येत नाही मग मोदी सरकारने दाखवलेले हेच का ‘अच्छे दिन’ असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जातोय.

“सध्या टोमॅटोला कवडीमोल बाजारभाव मिळत असून टोमॅटो मार्केट पर्यंत नेण्याचा वाहतूक खर्च सुद्धा निघत नसून एकरी एक ते सव्वा लाख रुपये खर्च करून पिक सोडून देण्याची वेळ आज टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आली असून,हीच पारीस्थिती सद्या सर्वच भाजीपाला पिकाची झाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक घ्यावे तरी काश्याचे असाव प्रश्न सध्या शेतकरी वर्गापुढे पडला आहे” 

- नंदकिशोर रौदळ, टोमॅटो उत्पादक शेतकरी, तळवाडे दिगर 

“उन्हाचा पार वाढला असून तो ४० शीच्या पार गेला आहे.अशा परिस्थिती सोन्यासासाखा माल पिकवून त्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असून, एकरी लाख ते सव्वा लाख रुपये खर्च करून आणि जर त्याच्यातून एक रुपया पण हाती येत नसेल तर शासनाने हस्तेक्षेप करून शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी आर्थिक मदत देऊन शेतकऱ्याला पुढील पिकासाठी  उभे केले गेले पाहिजे. आयात निर्यात धोरण हे चागल्या पद्धतीने राबवून सचिव दर्जाचे अधिकारी देवून आयात निर्यात धोरण (भाजीपाल्याचे) कार्यक्षम पद्धतीने राबविले गेले पाहिजे” 

- दीपक पगार, राज्य कार्यकारणी सदस्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शासनाने शेतकऱ्यांची थट्टा चालविली आहे. कुठल्याही पिकाला भाव नाही. उत्पादन खर्च सोडाच मजूरांना मजुरी देण्यासाठी हातउसनवार घेऊन द्यावे लागत आहेत. कांदा विक्री केलेले धनादेश वटत नसल्याने बाजारसमितींचा वचक नाही.

- पंढरीनाथ आहिरे, कांदा उत्पादक शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com