Dhule : जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये केवळ २३ टक्के पाणी

Akkalpada dam
Akkalpada damesakal

धुळे : जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत केवळ २२.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या काळात २७ टक्के जलसाठा होता. अक्कलपाडा प्रकल्पातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३.०४ टक्के जलसाठा कमी झाला आहे. अनेक लघू प्रकल्पांतही जलपातळी घटल्याने पाऊस लांबल्यास चिंता वाढणार आहे. त्यामुळे पाण्याची बचत (Water saving) आवश्यक आहे. अर्थात टंचाई (Water scarcity) निवारणासाठी विविध प्रकल्पांतून पाणी सोडले आहे, त्यामुळेदेखील या प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट झाल्याचे दिसते. दरम्यान, सुलवाडेत दोन टक्के, करवंदमध्ये ५.०४ तर सोनवद प्रकल्पांत यंदा तुलनेने १०.१७ टक्के जलसाठा अधिक आहे. (23 percent of water in district watersources Dhule News)

मृग नक्षत्र तोंडावर आहे. संपूर्ण उन्हाळ्यात तापमानाचा पारा ४० वर राहिल्याने बाष्पीभवनही वाढले. यावर्षी मे हिटचा तडाखा सर्वाधिक राहिला. ४४.५ अंश सेल्सिअसपर्यंत पारा गेल्याने जिवाची लाहीलाही झाली. जूनमध्ये तापमानाचा ३९, ४०, ४१ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. या तीव्र उन्हाळ्यामुळे पाण्याचा वापर व बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांमधील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. पावसाळा लांबल्यास उपलब्ध पाण्यावरच तहान भागवावी लागणार आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी टाळावी लागणार आहे.

Akkalpada dam
25 मिनिटात दुचाकी केली लंपास

जिल्ह्यातील १२ मध्यम प्रकल्प आणि ४७ लघू प्रकल्पांत सध्या २२.४४ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी तो २७ टक्के होता. १२ मध्यम प्रकल्पांत २२.५१ टक्के तर ४७ लघू प्रकल्पांत २२.२२ टक्के जलसाठा आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात २८.९५ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी या काळात नकाणे तलावात ४४.२६ टक्के जलसाठा होता.

Akkalpada dam
पालकांच्या खिशावर ‘महागाई’चा बोजा; शैक्षणिक साहित्य महागले

प्रकल्पनिहाय जलसाठा असा (टक्क्यांत)

प्रकल्प... शिल्लक साठा... मागील वर्षाची स्थिती

-सुलवाडे...३६.६४...३४.६४

-अनेर...३२...४०.३१

-करवंद...२९.३...२३.९९

-मालनगाव...२०.६५...३१.६९

-बुराई...१९.७०...२२.०३

-अक्कलपाडा...१८.३०...२१.३४

-जामखेडी...१८.२३...२०.१९

-अमरावती...१७.३९...३४.२१

-सोनवद...१४.२८...४.११

-वाडीशेवाडी...१३.११...४४.१०

-लाटीपाडा...१२.१८...२९.३४

-कनोली...६.२७...७.१०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com