केळी शीतगृहातील स्फोटात तीन ठार

अंतुर्ली (ता. मुक्‍ताईनगर) - केळी शीतगृहातील स्फोटामुळे झालेले नुकसान.
अंतुर्ली (ता. मुक्‍ताईनगर) - केळी शीतगृहातील स्फोटामुळे झालेले नुकसान.

मृतांमध्ये रावेरमधील दोन जण, अंतुर्ली फाट्यावरील घटना
मुक्ताईनगर/अंतुर्ली -  अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) फाट्यालगतच्या केळी रायपनिंग चेंबरमध्ये (केळी पिकविण्याचे शीतगृह) स्फोट होऊन तीन ठार, तर दोन जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी पाऊणला घडली.

स्फोटात शिवाजी दगडू साळुंखे (रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर) हा मजूर, तर सिलिंडर घेऊन आलेले निवृत्ती पाटील (वायली, ता. बऱ्हाणपूर, ह. मु. रावेर) व शेख शरीफ शेख खानू (रसलपूर, ता. रावेर) असे तीन मृत झाले. कंपनीबाहेर उभा असलेला केळीचा व्यापारी शेख हनीफ शेख हमीद हा गंभीर जखमी असून, त्यास बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथे उपचारार्थ हलविले आहे.
केळी पिकवण्याच्या कोल्ड स्टोरेजमध्ये वापरण्यात येणाऱ्या इथिलीन सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

निवृत्ती पाटील व शेख शरीफ रावेरहून दहा इथिलीनचे सिलिंडर घेऊन आले होते. ते सिलिंडर मध्ये ठेवत असताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com