धुळे जिल्ह्यात 324 कोटी पीककर्ज वितरित

जिल्ह्यात 1 एप्रिल 2022 पासून पीक कर्ज वितरणास सुरवात झाली.
pikkarj
pikkarjesakal

धुळे : खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खते वेळेत खरेदी करता यावेत यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वितरण सुरू आहे. आत्तापर्यंत ३० हजारावर शेतकऱ्यांना ३२४ कोटी ८३ लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एक एप्रिल २०२२ पासून पीक कर्ज वितरणास सुरवात झाली. धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, एमएससी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात येते. खरीप पीक कर्ज वितरणासाठी २०२२- २०२३ या आर्थिक वर्षासाठी धुळे जिल्ह्यास ७१३ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात आत्तापर्यंत ३० हजार ७१६ शेतकऱ्यांना ३२४ कोटी ८३ लाख चार हजार रुपये पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे.

pikkarj
100 मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये : कृषी विभाग

विविध बॅंकातर्फे वितरण

धुळे- नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे १७७ कोटी २० लाख रुपये, राष्ट्रीयकृत बँकांतर्फे १३५ कोटी, खासगी बँकांतर्फे नऊ कोटी ३६ लाख, तर ग्रामीण बँकेतर्फे दोन कोटी ९६ लाख रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. पीक कर्ज वितरणाचा जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी वेळोवेळी आढावा घेतात. त्यानुसार जिल्हाधिकारी शर्मा यांनी पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतला असून प्रत्येक सभासद शेतकऱ्याला पीक कर्ज वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनीही पीक कर्ज घेऊन शेतीत प्रगती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांच्यासह उपनिबंधक देशपांडे यांनी केले.

pikkarj
खरिपाच्या पेरण्या 97 हजार हेक्टरवर पूर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com