चार वर्षे शोषणानंतरही नोकरी, लग्नाविनाच!

Rape
Rape

जळगाव - नोकरी व लग्नाचे आमिष दाखवत विधवेवर चार वर्षे अत्याचार करणारे महापालिकेचे तत्कालीन उपायुक्त व सध्या मंत्रालयातील खात्यात उपसचिवपदी कार्यरत अधिकारी साजीद अमानुल्ला पठाण (वय ५०) यांनी तिला नोकरी दिली नाही अन्‌ लग्नही केले नाही. उलटपक्षी पोलिसांत तक्रार देऊ नये म्हणून धमकावण्यापर्यंत या अधिकाऱ्याची मजल गेल्याचे समोर आले आहे. 

शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी असलेले पठाण महसूल विभागात वरिष्ठ पदावर नोकरीस लागले. सध्या ते मंत्रालयात उच्च वैद्यकीय शिक्षण विभागात उपसचिवपदी कार्यरत असून, त्यांच्या निवृत्तीचा काळही जवळ आला आहे. जळगाव महापालिकेच्या उपायुक्तपदी कार्यरत असताना २०११ मध्ये विधवेवर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महसूल व महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. ओळखीतून नातेसंबंध आणि गणगोतापर्यंतची ओळख काढल्यावर त्यांनी पीडितेस महापालिकेत नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले आणि याच नावाखाली सलग चार वर्षे अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.  

अशी केली फसवणूक
निराधार म्हणून घरकुल मिळत नाही, नोकरीही लावून दिली नाही म्हणून जाब विचारल्यावर पठाण यांनी थेट दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव पीडितेसमोर मांडला. निराधार आणि आसरा मिळेल या आशेने पठाण यांची अंगबचाव करून बढतीवर बदली झाल्याने आश्‍वासनपूर्ती न करताच मुंबईला प्रस्थान केले. फसवणूक करून शोषण केल्याचे उघड झाल्यावर पीडिता दाद मागण्यासाठी बाहेर पडली.

धमक्‍यांचे सत्र 
फसवणूक केल्याचे सांगायला सुरवात केल्यानंतर पठाण यांचे पित्त खवळले, तक्रार करू नये यासाठी प्रयत्न सुरू झाले. चोवीस तास पडद्यात राहणारी अशिक्षित महिला तक्रार करणार नाही याची पठाण यांना खात्री होती. वर्षभरापूर्वी पीडिताने तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मात्र, नातलगांचा गोतावळा जमवून, खोटी समजूत काढून, प्रसंगी धमकावून तिला तक्रार देण्यापासून परावृत्त करण्यात आले.

‘ते’ डॉक्‍टर गेंदालाल मिल परिसरातील 
शहर पोलिस ठाण्यात साजीद अमानुल्लाखान पठाण यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून, त्यांना गुन्ह्यात मदत करणारे साथीदार अभियंता शंभू सोनवणे आणि डॉ. राजेश पाटील यांनाही सहआरोपी म्हणून नोंदविण्यात आले. सोनवणे हे इंडिया गॅरेजच्या गल्लीत वास्तव्यास असून, डॉ. राजेश पाटील गेंदालाल मिलमध्ये जनरल प्रॅक्‍टिशनर आहेत. त्यांच्या गेंदालाल मिलमधील रुग्णालयात पठाण यांची बैठक असल्याने तेथे बोलावून पीडितावर अत्याचार करण्यात आले.

‘पठाणी गुंड’ सैरभैर
गेल्या दोन वर्षांपासून पीडिता तक्रार देण्यासाठी दारोदार भटकत होती. निव्वळ गुन्हा दाखल करण्यासाठी पीडिताला दोन वर्षे पायपीट करावी लागली. या काळात अनेकांनी दबावतंत्राचा वापर केला. पीडिता व तिच्या मुलाला ठार मारण्याच्या धमक्‍या देण्यात आल्या. कुटुंबीयांना बदनामीची भीती घालून पीडिताला साथ देऊ नये, अशी तजवीज ‘पठाणी गुंडां’नी केल्याचे समोर आले आहे. तेव्हा दबाव आणणारे समाजाचे ठेकेदार आणि कायदेतज्ज्ञ म्हणवून फिरणाऱ्या ‘कावळ्यां’नी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोबारा केल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com