बागलाणमधील रस्त्यांसाठी ४९ कोटी ६५ लाखांचा निधी मंजूर

deepika-chavan
deepika-chavan

सटाणा - बागलाण विधानसभा मतदारसंघातील आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील रस्ते, पूल, दुरुस्ती व नवे मार्ग तयार करण्यासाठी राज्य शासनाने ४९ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

याबाबत बोलताना आमदार सौ.चव्हाण म्हणाल्या, बागलाण विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी व बिगर आदिवासी या २ क्षेत्रात मोडत असल्याने बिगर आदिवासी विभागात ३६ कोटी रुपये तर आदिवासी विभागात १३ कोटी ६५ लाख रुपयांच्या विकासकामांचा समावेश झाला आहे. आदिवासीसह बिगर आदिवासी मतदार संघातील रस्ते, नदी, नाल्यांवरील पुलांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील दळणवळणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याचे समाधान आहे.

या कामंमध्ये पुढील रस्त्यांसाठी ३६ कोटी ८ लाख ३३ हजार रुपयांची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे.

  • साक्री - नामपूर - मालेगाव रस्ता ते राज्यसीमा रस्ता, अहवा - ताहराबाद - नामपूर रस्ता 
  • अजमेर सौंदाणे - वायगाव - रावळगाव रस्ता
  • अहवा - ताहराबाद - नामपूर - लखमापूर रस्ता
  • नांदुरी - काठरे दिगर - मानूर - साल्हेर - अलियाबाद रस्ता 
  • सटाणा - अजमेर सौंदाणे - वायगाव रस्ता 
  • काठरे दिगर - डांगसौंदाणे - सटाणा - मालेगाव रस्ता नंदुरबार - साक्री - नामपूर - मालेगाव रस्ता 
  • अहवा - ताहराबाद - नामपूर - लखमापूर रस्ता 
  • मानूर - साल्हेर - अलियाबाद रस्ता 
  • मेशी - महालपाटणे - ब्राह्मणगाव - अजमेर सौंदाणे - कऱ्हे रस्ता 
  • उत्राणे - आसखेडा - आखतवाडे रस्ता 
  • मेशी - महालपाटणे - ब्राह्मणगाव - अजमेर सौंदाणे - कऱ्हे रस्ता 
  • पिंपळदर - तिळवण - कंधाणे - केरसाने - मुंगसे - मुल्हेर रस्ता 
  • आराई - वासोळ रस्ता 
  • मुळाने - दोधेश्वर - कोळीपाडा - कोटबेल - गोराणे रस्ता चिराई - महड - कजवाडे - गाळणे राज्यमार्ग 

आदिवासी विभागातील रस्त्यांसाठी १३ कोटी ६५ लाख रुपयांचा समावेश करण्यात आलेला असून यामध्ये पुढील रस्त्यांचा समावेश आहे. 

  • साल्हेर - तताणी - डांगसौंदाणे - सटाणा - मालेगाव - चाळीसगाव रस्ता 
  • पिंपळदर राज्यमार्ग २७ ते तिळवण - कंधाणे - जोरण - केरसाने - मुंगसे - मुल्हेर रस्ता 
  • काठरे दिगर - कुत्तरबारी - डांगसौंदाणे - सटाणा - मालेगाव रस्ता 
  • पिंपळदर राज्यमार्ग २२ ते तिळवण - कंधाणे - जोरण - केरसाने - मुंगसे - मुल्हेर रस्ता 
  • साल्हेर - तताणी - डांगसौंदाणे रस्ता, मानूर - साल्हेर - वाघंबा - अलियाबाद रस्ता 
  • नरकोळ पुलाचे रस्ता बांधकाम 
  • ताहाराबाद पुलाच्या रस्त्याचे बांधकाम
  • अहवा - ताहाराबाद - नामपूर रस्ता, वाडीचौल्हेर - तिळवण बारीरस्ता 
  • मुंगसे - साल्हेर रस्ता 
  • वाघंबा - अलियाबाद रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण
  • साल्हेर - तताणी - डांगसौंदाणे रस्ता पुलाजवळ संरक्षक भिंत बांधणे 
  • वाघंबा - अलियाबाद मोसम नदीलगत संरक्षक भिंत बांधणे 
  • अजंदे - हरणबारी घाट रस्त्याची दुरुस्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com