टँकरवर दिवसाला होतोय 50 हजाराचा चुराडा! 

yeola
yeola

येवला : साडेसाती नशिबीच पुजलेल्या येवल्यात आज मितीस ६४ गावे व वाड्यावस्त्याना तहान भागवन्यासाठी टँकरची गरज वेळ आली आहे विशेष म्हणजे टँकर सुरू असलेल्या ३१ गावातील सुमारे पंचवीस हजार नागरिकांची तहान भागविण्यासाठी शासनाचे रोज पन्नास हजारांवर रुपये खर्च होत आहे.महिन्याला १२ ते १५ लाख रुपये खर्चूनही नागरिकांची तहान भागत नसल्याने ग्रामीण भागातून टंचाईमुळे नागरिकांची हाल हाल मात्र सुरूच आहे.

टंचाईच्या झळा अल्प पावसामुळे डिसेंबरपासूनच जाणवत असताना प्रशासनाने मात्र मार्चपासून त्यातच वाढत्या उन्हामुळे उत्तरपूर्व भागातील आवर्षण प्रवण गावात थेंब पाण्याचा पत्ता नसल्याचे चित्र आहे यामुळे पाणीबाणी परिस्थिती होऊन महिलांसह वयोवृद्ध पुरुष व मुलाबाळांना देखील पाण्याचा शोध करण्याची वेळ अनेक गावात आली आहे.याचमुळे प्रशासनाकडे टँकरची मागणी वाढली असून धिम्यागतीने टँकर मंजुरी होत असल्याने अनेक गावात मात्र थेंब पाण्यासाठी महिलां मेल भटकंती होत आहे.वाढत्या उन्हासोबत भूजल पातळी घटू लागल्याने हातपंप बोअरवेल विहिरी पाणी योजना देखील माना टाकू लागले असून टँकरग्रस्त गावात टँकरचे पाणी देखील अपुरे पडत असल्याने यावरून वादावादी देखील सुरू आहे.

तालुक्यात पाणी टंचाईची व्याप्ती वाढू लागली असून,श्रोत संपूर्णपणे आटले असून पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढायला लागली आहे.पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मे महिन्यात तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.प्रशासनाकडून आज २९ गावे व ३ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु असून रोज १० शासकिय टंकर एक हजार ६०० किलीमीटर प्रवास यासाठी करत आहेत.दिवसाला आज ५० हजाराच्या आसपास खर्च केवळ पाण्यासाठी होत असून यात ७५ ते ८० हजारापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.ग्रामीण भागात पाणीच नसल्याने शहरातील नांदूर विहिरीवरून टंकर भरले जात असून येथून सर्वत्र पाणीपुरवठा होत असल्याने किलोमीटर वाढत आहे.पाण्याचा बेसुमार उपसा आणि नियोजनशून्य पाण्याचा वापर यामुळे तालुक्यात ९ मीटरच्या खाली भूजल पातळी गेली आहे.अनकाई सारख्या भागात १८ मीटर पर्यंत कोरडी विहीर जाते.यावरून पाण्याच्या पातळीचा अंदाज येतो.

ही गावे टँकरवर अवलंबून -
अनकाई,राजापूर,तांदूळवाडी,वाघाळे,कौटखेडे,तळवाडे,नायगव्हाण,हडपसावरगाव,भुलेगाव,रेंडाळे,धनकवाडी,देवदरी, बाळापुर, कुसुमाडी, चांदगाव,ममदापूर,खैरगव्हाण,जायदरे,आहेरवाडी,वाईबोथी,खरवंडी,कासारखेडे,पिंपळखुटे तिसरे,कोळगाव,

खिर्डीसाठे,लहित,गुजरखेडे,सोमठाणजोश,पांजरवाडी, खैरगव्हाण (गोपाळवाड), सायगाव येथील महादेववाडी या २९ गावे व ३ वाड्यांना दहा शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहेत.कुठे एक तर कुठे दोन खेपा टाकल्या जात असल्याने दिवसभरात ३७ खेपा होत आहेत.

मंजुरी मिळाली पण टँकरच्या प्रतीक्षेत...
गोरखनगर,वसंतनगर,आडसुरेगाव,गारखेडे,नीळखेडे,देवठाण,गणेशपूर या गावासह ममदापूरतांडा वस्ती,पिंपळखुटे बुद्रुक (पगारे वस्ती) या दोन वाड्या,येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा मंजूर असला तरी जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारा पाणीपुरवठा करण्यासाठी सहा पाणीटँकर येवल्यात पोहचले नसल्याने येथे पाणीपुरवठा करता आला नाही. ही गावे पाण्याच्या टँकरच्या प्रतीक्षेत आहेत.

नव्याने कोळम बुद्रुक,कोळम खुर्द,डोंगरगाव,खिर्डीसाठे (हनुमानगर) आणि नगरसूल परिसरात असणाऱ्या १९ वाड्या वस्तीवरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले आहेत.नगरसुलचे १९ वाड्या वस्तीवरचे हे प्रस्ताव प्रांत कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

“व्याने तीन गावे व एक वाडी यांचे पाणी टँकरच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे आला आहे.पाणीटंचाईची  स्थळ तहसील व पंचायत समिती स्तरावरील स्थळ पाहणी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रांत कार्यालयाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.”

- सुनील अहिरे, गटविकासअधिकारी, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com