सटाण्यात कर्णकर्कश आवाजात वाद्य वाजविणाऱ्या बँड मालकाविरोधात गुन्हा दाखल

The accused filed a complaint against the musician playing the instrument in a harpoon voice
The accused filed a complaint against the musician playing the instrument in a harpoon voice

सटाणा : सार्वजनिक शांततेचा भंग करून सटाणा शहरात कर्णकर्कश आवाजात वाद्य वाजविणाऱ्या मोरेनगर (ता.बागलाण) येथील बँडमालकासह चौघांवर सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश पी. जी. तापडिया यांनी दिले असून संबंधितांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहर व तालुक्यात समाधान व्यक्त केले जात असून बँड मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

सटाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील यांनी आज याबाबत माहिती दिली. सटाणा शहरात रविवार (ता.१५) ला सायंकाळी सात वाजता सटाणा न्यायालयासमोरून जाणाऱ्या रस्त्यावर मोरेनगर (ता.बागलाण) येथील सुखकर्ता बँड पथक कर्णकर्कश आवाजात वाद्य वाजवीत असल्याचे निदर्शनास आले. हा परिसर सायलेन्स झोन आहे. मात्र जोरात वाद्य वाजवून सार्वजनिक ठिकाणी गोंगाट निर्माण केला व शांततेचा भंग करीत लोकांना अस्वस्थता निर्माण केली. यावेळी सटाणा पोलिस ठाण्याचे कर्मचारी के.एस.सूर्यवंशी, पी.एस.शिंदे, वाय.एस.गुंजाळ यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम कायद्यान्वये थेट घटनास्थळी सुखकर्ता बँड पार्टीचे मालक राजेंद्र चलवादे (रा. मोरेनगर, सटाणा), वाद्य वाजविणारे विश्वास रमेश माळी, अजय छोटू अहिरे, प्रवीण रघुनाथ सोनवणे, (तिघे राहणारे इंदिरानगर, ताहाराबाद) यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना बँडसह अटक केली आहे. त्यांना सात दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत नाशिक कारागृहात पाठविण्यात आले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com