येवला - आधारभूत योजनेत खरेदी विक्री संघाचे कामकाज राज्यात प्रभावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

येवला : तालूक्यात शासकीय आधारभुत किंमत योजना प्रभावीपणे राबवून सहा कोटीची शेतमालाची खरेदी झाल्याने शेतकरी हित साधले गेले आहे. यामुळे संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शासकिय आधारभुत किंमतीने येथे सर्वाधिक विक्रमी खरेदी होऊन राज्यात तालुका खरेदी विक्री संघ अग्रस्थानी पोहचला असल्याचे प्रतिपादन तालुका सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी केले.

येवला : तालूक्यात शासकीय आधारभुत किंमत योजना प्रभावीपणे राबवून सहा कोटीची शेतमालाची खरेदी झाल्याने शेतकरी हित साधले गेले आहे. यामुळे संघाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शासकिय आधारभुत किंमतीने येथे सर्वाधिक विक्रमी खरेदी होऊन राज्यात तालुका खरेदी विक्री संघ अग्रस्थानी पोहचला असल्याचे प्रतिपादन तालुका सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी केले.

हरबरा खरेदीचा शुभारंभ सोमवारी (ता. 09) संघात झाला, यावेळी पाटील बोलत होते. शासकीय आधारभुत किंमत योजनेअंर्तगत हरबरा खरेदीचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटील होते. प्रमुख पाहूणे नगरसेवक प्रविण बनकर, नगरसेवक रूपेश दराडे, रायगड ग्रुपचे अरविंद शिंदे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष भागुनाथ उशीर, संपर्क कार्यालय प्रमुख बी.आर. लोंढे, सहकार आधिकारी विजय बोरसे, नाफेड ग्रेडर पोपट जाधव उपस्थित होते.

शासकीय योजनेअंर्तगत प्रति क्विंटल ४ हजार ४०० रुपये दराने हरबरा खरेदी सुरू झाली असून ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. ९५ शेतकऱ्यांनी हरबरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. प्रतिएकर ४ क्विंटल प्रमाणे हरबरा खरेदी होणार आहे.संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर, उपाध्यक्ष नाना शेळके व सर्व संचालक मंडळाचे कामकाज कौतुकास्पद असल्याचे यावेळी पाटील व इतर मान्यवर म्हणाले.

याप्रसंगी उपाध्यक्ष नाना शेळके, दामु पवार, संचालक दिनेश आव्हाड, शिवाजी धनगे, भास्कर येवले, भागुजी महाले, दत्ता आहेर, त्र्यंबक सोमासे, रामदास पवार, बंडू शिंदे, दिलीप सोळसे, रविंद्र गायकवाड, रामा शेळके बापू शेजवळ, ज्ञानेश्वर जाधव, व्यवस्थापक बाबा जाधव, नंदू भोरकडे, संतोष खकाळे आदी उपस्थित होते.

"हरबरा खरेदीसाठी कमी कालावधी असल्याने शेतकऱ्यांनी पिकपेऱ्यासह सातबारा उतारा, बँक पासबुक व आधार कार्डसह हरबरा विक्रीसाठी आणावा. तात्काळ ऑनलाईन नोंदणी करुन शेतमाल खरेदी केला जाईल, असे  खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भागुनाथ उशीर यांनी सांगितले. 

"खरेदी केलेल्या मकाचे सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट अदा झाले आहे. ३५० शेतकऱ्यांनी आधारभुत किंमतीने ३ हजार ४३२  क्विंटल तूर विक्री केली असुन त्यापैकी २८४ शेतकऱ्यांचे पेमेंट अदा झाले आहे, असे खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी सांगितले. 

Web Title: in adharbhut scheme effective work of yeola kharedi vikri sangh