आदिवासी विद्यार्थ्यांचा आयुक्तालयाबाहेर ठिय्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

नाशिक - तीन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती तत्काळ मिळावी, ऑनलाइन प्रक्रिया नसलेल्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया राबवावी, प्रवेश अर्ज भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश द्यावा, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे आज आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

राज्यातील विविध शिक्षण संस्थांत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीमधील अनेक विद्यार्थी तीन वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. महाविद्यालय प्रशासन व प्रकल्प अधिकाऱ्यांकडून एकमेकांकडे बोट दाखवित टोलवाटोलवी करून विद्यार्थ्यांचे नुकसान केले जात आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गृहपालांकडून धमकावले जाते. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनद्वारे प्रवेशअर्ज करण्याची कुठलीच सुविधा नसेल अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीनेच प्रवेशप्रक्रिया राबविली जावी. वसतिगृहात प्रवेशाबरोबर शिष्यवृत्तीचे अर्ज भरून घेतले जावेत, 11 नोव्हेंबर 2011 च्या शासन निर्णयाची ठोस अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांसाठी नगर जिल्ह्यातील विद्रोही विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेत त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांच्या मागण्यांवर विचार करीत त्या शासन दरबारी मांडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच, विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून गृहपालांची चौकशी करून दोन दिवसांत कारवाई करण्याचेही आदेश दिले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी संदीप कोकाटे, डॉ. जालिंदर घिगे आदी उपस्थित होते.

Web Title: adivasi student sit-out