शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक अांदोलन - रघुनाथदादा पाटील  

 दगाजी देवरे 
मंगळवार, 3 एप्रिल 2018

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेलभरो अांदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीचे सदस्य, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा प्रदेश अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज सायंकाळी येथे दिला.

धुळे (म्हसदी) - 'सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रडकुंडीला आला आहे. शेती व्यवसाय मालाच्या उतरत्या दरामुळे धोक्यात आला आहे. याला शासन जबाबदार आहे. शेतकरी आत्महत्येस अलिकडची राजकीय राजवट जबाबदार आहे. सरकार कोणतेही असू द्या शेतकरी विरोधाचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जेलभरो अांदोलन करण्याचा इशारा' शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीचे सदस्य, शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते तथा प्रदेश अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी आज सायंकाळी येथे दिला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी आज दिवसभर तालुक्यात आठ ठिकाणी सत्यशोधक शेतकरी सभा झाली. म्हसदीत सायंकाळी क्रांतीसिंह नाना पाटील जथ्थाच्या डाॅ. वाणी चौकात झालेल्या सभेत रघुनाथदादा पाटील बोलत होते. सरपंच सतीश देवरे अध्यक्षस्थानी होते.

शेतकरी, कामगार नेते सुभाष काकूस्ते, प्रा. सुशिलाताई मोराळे (बीड), रुक्मिणीताई गिते, दीपक जगताप, निळकंठ शिंदे, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाचे अध्यक्ष हिंम्मतराव देवरे, सचिव सुभाष देवरे, संचालक यशवंतराव देवरे, हरीभाऊ सोनू देवरे, जीर्णोध्दार मंडळाचे उपाध्यक्ष यादवराव देवरे, ग्रामपंचायतीचे जेष्ठ सदस्य गंगाराम देवरे, शेतकरी संघटनेचे नेते हिम्मत देवरे, माजी सरपच चंद्रकांत देवरे, डाॅ. वंसतराव देवरे, कुंदन देवरे उपस्थित होते.

रघुनाथदादा पाटील यांनी शासनाने तूर खरेदीत मोठा गफला केल्याची टिका केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी दिशाभूल करणारी आहे. दर वाढीच्या तफावतीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या. हे धनदाडग्यांना पाठबळ देणारे सरकार आहे. म्हणून शेतकरी, शेतमजूर जागा झाला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. प्रा. सुशिलाताई मोराळे यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे सांगत शेतकरी, शेतमजूरांच्या व्यथा केल्या. 27 एप्रिलच्या पुणे येथे होणाऱ्या शेतकरी यात्रेस उपस्थितीचे आवाहन प्रा. मोराळे केले. म्हसदीसह परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने गंगाराम देवरे, सरपंच सतीश देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच सतीश देवरे यांनी शहिद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेस संपूर्ण म्हसदीसह परिसराचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. आज दिवसभर क्रांतीसिंह नाना पाटील जथ्थाची म्हसदी, पिंपळनेर, छाईल, कासारे येथे तर क्रांतीवीर बिरसामुंडा जथ्थाची दहिवेल, दुसाने, वाल्हवे व जैताणे येथे सभा झाली. धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने संयोजन केले.

Web Title: Aggressive movement on farmers issues says raghunathdada patil