तरसाळी - शेतकऱ्यांनी ठिय्या देत लोकप्रतिनिधीचा व प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध केला

farmers
farmers

तरसाळी (जि.नाशिक) - बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्रमांक आठच्या प्रलंबित कामास तात्काळ सुरवात करावी  यासाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी काल बुधवार (ता.१५) रोजी स्वातंत्र्य दिनी विंचुर प्रकाशा महामार्ग विरगांव चौफुलीवर सुमारे दोन तास अडवून व ठिय्या देत लोकप्रतिनिधीचा व प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या वतीने डॉ. शेषराव पाटील यांनी आंदोलन स्थळी आधिकारी वर्गासोबत भेट देऊन कामात असलेल्या तांत्रिक अडचणी तात्काळ दुर करण्याचे वचन देऊन ३० सप्टेंबरच्या आत चारीच्या कामास सुरवात करण्याचे ठाम अश्वासन आंदोलन करत्यांना दिल्यावरच हे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

१२ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेल्या चारी क्रमांक आठ चे काम पडुन आहे. पडुन असलेल्या कामाला चालना मिळावी यासाठी या लाभक्षेत्रातील १५ गावांमधील शेतकरी वर्ग काल स्वातंत्र्य दिनी विरगांव चौफुलीवर शेकडोच्या संख्येने एकत्र येत महामार्ग एक ते दिड तास अडवून धरत निषेध केला.१९९९मंजुरी मिळालेली चारी १८वर्षे उलटुन गेल्यावर देखील अपुर्ण आहे. या कामाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी नेहमीच डोळेझाक केल्याने हे काम वर्षानुवर्षे रखडलेले असुन यास सर्वस्वी आमदार, खासदार जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. हेकाम चालु होण्यासाठी वेळोवेळी निवेदने शासन दरबारी दिले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला.महामार्ग आंदोलन करत्यांनी  अडवून धरल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. चारीचे काम लवकर चालु करा,आमदार व खासदार यांनी या ठिकाणी येउन कामात येणाऱ्या अडचणी व प्रगती सांगावी यासाठी आंदोलन कर्ते अडुन बसले होते. याकाळात मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी करण्यात आल्याने आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र खासदार सुभाष भामरे यांचे निकटवर्तीय शेषराव पाटील आंदोलन स्थळी धाव घेत शेतकरी वर्गाच्या समस्यांचे निराकरण करीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

येत्या ३० सप्टेंबरच्या आत काम सुरु करण्याबाबत ठोस लेखी आश्वासन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना देण्यात आले. मात्र ३० सप्टेंबर च्या आत काम सुरु न झाल्यास २ ऑक्टोबर रोजी थेट चारीतच उपोषण करण्याचे आव्हान कृती समितीतर्फे करण्यात आले. या आंदोलनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधीनी पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com