कर्जबाजारी शेतकऱ्याची इजमाने येथे आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

अंबासन (नाशिक) - नामपूर येथील शेतकरी भिकन श्रावण सावंत (वय 51) यांनी आज इजमाने फाट्याजवळ विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सततच्या नापिकीमुळे विवंचनेत असलेल्या सावंत यांच्यावर हातऊसनवार घेतलेले कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सावंत यांची नामपूर शिवारात तीन एकर शेती आहे. मात्र, सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. गेल्या तीन-चार दिवसांपासून ते अस्वस्थ होते.