कॅन्सर जनजागृतीसाठी धावल्या जळगावातील महिला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

जळगाव - कॅन्सर जनजागृतीसाठी आयोजित पिंकेथॉन मॅरेथॉन स्पर्धेत जळगावातील 5 महिला धावल्या. ब्रेस्ट कॅन्सर व आरोग्याच्या जागृतीसाठी नुकतीच भारतात दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद, गुवाहाटी व अहमदाबाद येथे "पिंकेथॉन' ही महिलांची मॅरेथॉन स्पर्धा झाली. यात मुंबई कुर्ला येथील एम.एम.आर.डी.ए मैदानावर झालेल्या स्पर्धेत भारतातून सुमारे 10 हजार महिलांनी सहभागी होत "कॅन्सरमुक्त' भारताचा संदेश दिला.

मुले, घर, संसाराची जबाबदारी व पतीच्या कामामध्ये मदत करताना अनेक महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात परंतु त्यांनी लक्षपूर्वक धावण्याच्या व्यायामाला वेळ दिल्यास त्यांचेही आरोग्य सुदृढ होईल यासाठी पिंकेथॉन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत महिला 21 किमी, 10 किमी, 5 किमी व 3 किमी अंतर धावल्या. शहरात सुदृढ आरोग्यासाठी जळगाव रनर्स ग्रुपने धावण्याबद्दलची जागृकता निर्माण करत पुरुष धावपटूंनी मागील काही दिवसात औरंगाबाद, लोणावळा, बंगळुरु, मुंबई याठिकाणी जाऊन धावण्याच्या शर्यतीत सहभाग नोंदविला त्याचप्रमाणे पुरुषांसोबतच आता महिलांनी देखील या शर्यतीत सहभाग नोंदविला.

दरम्यान बोस्टन मॅरेथॉन 2017 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व पुमा कंपनीच्या ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर खानदेश कन्या क्रांती साळवी यांनी जळगाव येथील सहभाग महिलांना मार्गदर्शन केले. घरातील कामे व मुलांकडे लक्ष देत व्यक्तिमत्त्व व आरोग्यासाठी महिलांनी वेळ देण्याची आवश्‍यकता आहे यासाठी अधिकाधिक महिलांनी रनर्स ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सहभागी महिलांनी केले आहे.

जिल्ह्यातील या महिलांचा सहभाग
शहरात पाच महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यात वेदांती किरण बच्छाव 75 मिनीट, डॉ. तृप्ती ज्ञानेश्‍वर बढे 75 मिनीट, प्रेमलता प्रकाश प्रकाश सिंग 60 मिनीट, अंकिता अमर कुकरेजा यांनी 73 मिनिटात 10 किलोमीटर अंतर वेळेत पूर्ण केले. तर सपना संदीप काबरा 44 मिनिटात 5 किलोमीटर धावल्या.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव - एमआयडीसीच्या जमिनीबाबत 1995च्या परिपत्रकाची स्थिती काय, असे वारंवार विचारल्यानंतर अखेरीस सरकारने हे परिपत्रक नुकतेच...

12.18 AM

सोनगीर (धुळे): सोनगीरला उद्यापासून ग्राहक कार्यकर्ता राज्यस्तरीय प्रबोधन अभ्यासवर्ग होत आहे. यातून दोन दिवस (ता. 19 व 20)...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

चिमूर : तालुक्‍यातील हळद उत्पादकांना नावीन्यपूर्ण सुधारित हळद लागवड कार्यक्रमांतर्गत प्रोत्साहन म्हणून मिळणारे अनुदान काजळसर...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017