देवनाचा प्रकल्प, लष्करी कॅम्पसह सौर ऊर्जा प्रकल्पाला नेटकरीनी दिली मान्यता

social media
social media

येवला : भारम येथे देवनदी-देवनाचा महत्वाकांक्षी जोड़ प्रकल्पाचे काम लवकरच चालू करणार असल्याची घोषणा मंत्री महोदयांनी आज नाशिक येथे केली...ही बातमी
आज तालुक्यात सोशल मीडियावर झळकली अन अनेकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

मात्र काही वेळाने ही बातमी म्हणजे निव्वळ एप्रिल फुल असल्याचे लक्षात येताच हसू अन संताप व्यक्त करण्याशिवाय पर्याय उरला नाही. डोंगरगाव परिसरात होणारा लष्करी कँम्प व भारम येथे होत असलेला सौर ऊर्जा प्रकल्प यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत ऊभी करण्यासाठी पाणी हवे त्यासाठी भारम येथील सटवाई डोंगर व त्या समोरील डोंगर असा एक कि.मीटर लांबी व १५मीटर उंच असा देवनार प्रकल्प उभारणार असुन त्यासाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी पूर्व वाहिनी व पश्चिम वाहिनी नदी जोड प्रकल्पातंरगत देवनदी-देवनाचा जोड प्रकल्प हा भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहे.

प्रकल्पासाठी भारम व कोळम हि गावे उठणार असल्याचेही भाकीत करण्यात आले होते. शिवाय परिसरातच सर्व सुविधांयुक्त स्मार्टसिटी बणवणार असून प्रकल्प ग्रस्तांना प्रत्येकी एक फ्लॅट पण देण्यात येईल....असे देखील भाकीत तालुक्यातील विविध व्हाट्स अँप ग्रुपवर फिरणाऱ्या या वृत्तात करण्यात आले होते.विशेष म्हणजे ही बातमी तयार करतांना हुबेहूब एखाद्या वर्तमान पत्राचीच असल्याचे भासले जात असल्याने अनेकांना यात तथ्य वाटत होते.

दिवसभर अनेक ग्रुपवर ही बातमी फिरत असतांना अखेर सायंकाळी या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे यांनी या पोस्ट मधील सर्व गोष्टी फेक असून एप्रिल फुल केला आहे. तसेच उगाच समाजात गोंधळ, भीती, शंका,निर्माण होईल अशी पोस्ट फॉरवर्ड करू नये असे आवाहन केल्याने सर्व गोंधळ मिटला.मात्र चर्चा सुरूच राहिली.

एक झाड लावून एप्रिल कुल करा...
एक एप्रिल म्हटले की सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात एप्रिल फुलच्या गमतीदार पोस्ट फिरत असतात.मात्र यंदा सोशल मिडियावर चक्क पर्यावरण संवर्धणासाठी जनजागृतीचे पोस्ट आणि मेसज सर्वत्र पाठविले जात होते. सर्वांना विंनंती आहे की "एप्रिल फूल करण्यापेक्षा एक, झाड लावून एप्रिल कुल करा" याबरोबरच सांगा ठणकावून सगळ्यांना, तापमान वाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने एक एक झाड लावू या   
आणि पुढील वर्षापासून..एप्रिल फूल ऐवजी एप्रिल कूल करू या..अशा स्वरूपाचे मराठी आणि इंग्रजीतील मेसेज व पोस्ट फेसबुक आणि व्हॉट्सअप वर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पर्यावरण संवर्धन आणि संवर्धनाचा प्रभावी संदेश सर्वांपर्यंत पोहचला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन...
सायंकाळी अजून एक ब्रेकींग न्यूज सोशल मिडियावर फिरत होती.राष्ट्रवादी काँग्रेस अखेर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होऊन शरद पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी पहाटे पाच पर्यंत बैठक चालली.  मजबूत तिसऱ्या आघाडीने भाजपला फुल टशन मिळण्याची चिन्हे...या संदेशाने देखील चांगलीच करमणूक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com