धुळे : चोरीची कार घेणाऱ्यास अटक

Stolen Car
Stolen Caresakal

धुळे : मालेगाव तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारचोरीचा (Car theft) गुन्हा उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखेने कार खरेदी (Car Purchasing) करणाऱ्या धुळे शहरातील तरुणाला अटक केली. त्याच्याकडून कार व मोबाईल असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. (Arrest of car thief Dhule Crime News)

रानमळा (ता. धुळे) शिवारात चोरीच्या कारची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सावळदे-रानमळा टी- पॉइंट येथे संशयित कार शेजारी उभ्या असलेल्या एका जणाला ताब्यात घेतले. भावेश मिलिंद जोशी (रा. एकतानगर, देवपूर, धुळे) असे त्याने नाव सांगितले. तो कापड दुकानदार आहे. त्याला कारबाबत विचारले असता त्याने बाळूसिंग दिलीपसिंग टाक (रा. दंडेवाला बाबानगर घरकुल, मोहाडी उपनगर, धुळे) याने त्याच्या साथीदारासह चार ते पाच दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील एका गावातून चोरी केल्याचे व ही कार (एमएच-२० आरजे-१५४५) मी खरेदी करीत असल्याचे सांगितले. पोलिसांनी कारची पाहणी केली असता त्यात कागदपत्रे मिळून आली.

Stolen Car
पालकांच्या खिशावर ‘महागाई’चा बोजा; शैक्षणिक साहित्य महागले

कारवरील नंबर प्लेट व कागदपत्र यात तफावत दिसून आली. तसेच वाहन चिखलओहोळ (ता. मालेगाव) येथून १ जूनला मध्यरात्री चोरीस गेल्याचे समजले. याबाबत मंगेश सीताराम भामरे यांच्या फिर्यादीवरून मालेगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल आहे. वाहनात मिळून आलेली कागदपत्रे फिर्यादीच्या नावाची आहेत. फिर्यादीत नमूद इंजिन व चेचीस क्रमांक असलेली व बनावट नंबर प्लेट (एमएच-२० आरजे-१५४५) कार भावेश जोशी याच्या ताब्यात मिळून आल्याने कार व दहा हजारांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, प्रकाश पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, संजय पाटील, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, संदीप सरग यांनी ही कारवाई केली.

Stolen Car
Dhule : जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये केवळ २३ टक्के पाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com