पत्नीची हत्या करून पळालेल्यास अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नांदगाव - पत्नीला जाळून तिला वरच्या मजल्यावरून खाली ढकलून देत, तसेच नंतर रुग्णालयात मरणाच्या दारात सोडून पळ काढणारा पती मनोज हृदयनारायण मिश्रा (सध्या रा. बदलापूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) यास नांदगाव पोलिसांनी गजाआड केले. पुढील तपासासाठी त्यास काल रात्री बदलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

नांदगाव - पत्नीला जाळून तिला वरच्या मजल्यावरून खाली ढकलून देत, तसेच नंतर रुग्णालयात मरणाच्या दारात सोडून पळ काढणारा पती मनोज हृदयनारायण मिश्रा (सध्या रा. बदलापूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) यास नांदगाव पोलिसांनी गजाआड केले. पुढील तपासासाठी त्यास काल रात्री बदलापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. 

मनोज हा पत्नी सोनी हिच्यासह बदलापूर येथे कीर्ती पोलिस लाइनजवळ अद्वय अपार्टमेंटमध्ये राहत होता. कुरापत काढून सोनीला घरातच जाळण्याचा त्याने प्रयत्न केला. ती अर्धवट जळालेली असताना तिला इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. लोकांच्या दबावामुळे तिला आधी उल्हासनगर व नंतर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. जे.जे.मध्ये तिच्यावर उपचार सुरू असतानाच मनोजने तिथून पळ काढला. रेल्वेने प्रवास करून तो नांदगाव येथे उतरला. दारूच्या नशेत "मी बायकोचा खून केला, तिला जाळून मारले,' अशी बडबड करताना आढळून आला. साध्या वेशातील पोलिसांना याची माहिती मिळाली. अति मद्यसेवानाने एक जण दुकानासमोर पडला असल्याची माहिती दुकानदाराने पोलिसांना दिली. या संशयितास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे सीम कार्ड नसलेले तीन अँड्रॉइड मोबाईल व सुटी पाच सीम कार्ड आढळून आली. पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने सर्व माहिती दिली. पोलिस हवालदार रमेश पवार यांनी बदलापूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधत खात्री केली. रात्री उशिरा बदलापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

उत्तर महाराष्ट्र

सोनगीर (जिल्हा धुळे): येथे स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत गोंधळ अनावर झाल्याने ग्रामसभा मध्येच तहकूब करण्यात आली. याप्रकरणी ग्रामसभेचे...

06.06 PM

सोनगीर (जि. धुळे) : झोपडी जळून सर्वस्व खाक झाले. संसारोपयोगी भांडी, कपडे, अन्नधान्य, मुलांचे दप्तर एवढेच नव्हे तर रेशन कार्ड...

10.03 AM

पिलखोड (ता. चाळीसगाव) : काकळणे(ता. चाळीसगाव) शेती शिवारात निंदणीचे काम चालू असताना महिला मजुरांमधील जिजाबाई नाईक यांच्यावर...

09.24 AM