ग्रामीणप्रमाणेच शहरी भागात राबविणार "अस्मिता' योजना  - पंकजा मुंडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नाशिक - ग्रामीणप्रमाणेच शहरी भागातील शाळांमध्ये "अस्मिता' योजना राबविण्यात येईल. त्यासाठी नगरविकास आणि आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येईल, असे आज येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. तसेच सॅनिटरी नॅपिकनची किंमत शून्यापर्यंत आणत असतानाच बचत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनच्या जोडीलाच इतर उत्पादनांची "मार्केटिंग' प्रणाली विकसित करण्याची ग्वाही त्यांनी दिली. "अस्मिता जिल्हा' म्हणून नाशिकने स्थान मिळविल्यानिमित्त इदगाह मैदानावर "अस्मिता' स्वच्छता व आरोग्य आयाम महिला मेळावा झाला. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

17 टक्के महिलांकडून वापर  
राज्यात 17 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात. गरिबी, उपलब्धतेचा अभाव, अंधश्रद्धा अशी कारणे त्यामागील आहेत, असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या, की ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची मासिक पाळीच्या कारणास्तव 40 ते 50 दिवस शाळा वर्षाला बुडते. या पार्श्‍वभूमीवर राज्यात महिलादिनी "अस्मिता' योजना सुरू केली असून, आरोग्य व स्वच्छताविषयक जागृतीसाठी दाखविण्यात येत असलेला "पॅडमॅन' चित्रपट 80 हजार मुलींनी पाहिला आहे. योजनेच्या "अस्मिता' निधीसाठी पहिली देणगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच "पॅडमॅन' चित्रपटातील अभिनेते अक्षयकुमार यांनी दहा हजार मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी देणगी दिली. मुळातच, सॅनिटरी नॅपकिनची किंमत महिला आणि मुलींना परवडत नसल्याने पुरवठा वाढवून किंमत कमी करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले.

Web Title: asmita scheme will be implemented in urban areas as well as in rural areas