मंगळवेढ्यात डोळ्यांत चटणी टाकून हल्ला ; एकाला ताब्यात

Attack with chutney in the Mangalvedha A man in possession
Attack with chutney in the Mangalvedha A man in possession

मंगळवेढा : टॅक्टर अपघातातील मुलाच्या मयतीचा गुन्हा कबुल करावा म्हणून भर न्यायालयातच फिर्यादी रामचंद्र कोंडिबा पुजारी यांनी आरोपी ट्रॅक्टरचालक पांडुरंग बंडगर यांच्या डोळ्यात चटणी टाकून चाकू हल्‍ला केला. यात बंडगर जखमी झाला असून, हल्‍ला करणार्‍या पुजारी यास न्यायालयात हजर असलेल्या पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले आहे. 

फिर्यादी रामचंद्र पुजारी रा. तामदर्डी यांचा मुलगा संकेत (वय १६) मित्र निखिल जाधवसह माचणूर येथे दहावीच्या निरोप समारंभासाठी दुचाकीवरून जात असताना 3 मार्च 2017 रोजी दुचाकी व ट्रॅक्‍टर अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातातील पांडुरंग बिरा बंडगर (रा. तळसंगी) यांच्या ट्रॅक्‍टरने दुचाकीला धडक दिली. यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामचंद्र पुजारी यांनी न्यायालयात गुन्‍हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी आज मंगळवेढ्यातील सह-दिवाणी न्यायाधीश तथा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. बी. नडगदल्ली यांच्यासमोर होती. 

याच आवारातील खोली क्रमांक ७ समोर आरोपी पांडुरंग बंडगर आणि फिर्यादी रामचंद्र पुजारी याने मुलाच्या मृत्युचा राग मनात धरून बंडगर याच्या डोळ्यात चटणी टाकली आणि अचानक अंगावर चाकूने वार केले. या हल्‍ल्यात आरोपी पांडुरंग बंडगर हा जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com