वाळूमाफियांचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

yeola
yeola

येवला - राजापूर-ममदापूरच्या वनहद्दीत शिकाऱ्यांपाठोपाठ वाळूमाफियांची दादागिरी सुरु झाली आहे.रविवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान ममदापुर शिवारातील सोनार नाल्यातून वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांना वनविभागाच्या पेट्रोलिंग पथकाने रंगेहाथ पकडले.याचा राग आल्याने आठ ते दहा वाळू माफियांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक करत प्राणघातक हल्ला केला.यात एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.तर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ हेही जखमी झाले आहेत.

तब्बल आठ ते दहा गावांच्या परिसरात हि वनहद्द विस्तारलेली असून त्या तुलनेत कर्मचारी व उपलब्ध साधनसामुग्री नाममात्र आहे.त्यातच हरणाच्या शिकारीच्या घटना घडत असतांना आता वाळूचोर देखील मुजोरी करू लागले आहेत.विशेष म्हणजे आजूबाजूच्या गावात देखील अनेकांनी वाळूचा गोरखंधंदा मांडला आहे.रविवारी तर थेट तारूखेडले (ता.वैजापूर) येथिल दोन-तीन ट्रक्टर वाळू चोरीसाठी आले होते.पेट्रोलिंग पथकाला माहिती मिळताच हे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वाळू माफियांनी थेट वनरक्षक,वाचमन यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.सावधानता बाळगत वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ,वनसेवक पोपट वाघ,विजय लोंढे,मछिंद्र ठाकरे, मनोहर दाणे यांनी येवल्याहून वनरक्षक गोपाल हारेगावकर तसेच राजापूर येथून काही वनमित्रांना बोलवून घेतले व आपली सुटका करून घेतली. मात्र अनेक जन जमा झाल्याचे पाहून हे वाळूमाफिया अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

या हल्ल्यात एक वनमित्र जबर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरु आहे.तर वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ यांना दूखापत झाली आहे.चोरट्यांचा एक ट्रक्टर वनविभागाने जप्त केला असून याप्रकरणी वनरक्षक वाघ यांनी तालूका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पूढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करीत आहेत. आरोपींचे फोटो वनकर्मचार्यांकडे उपलब्ध असून लवकरच वाळूमाफिया संशयित आरोपींना अटक होण्याचा विश्वास पोलिसानी व्यक्त केला आहे.रात्री घटना घडलेली असतांना पोलिसांनी आज दुपारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

“वनविभागाच्या हद्दीत येऊन वाळूचोरी करणे गैर आहे.आमच्या कर्मचार्यांच्या जागरूकतेने हा प्रकार उघडकीस आला. या वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू.तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना यापुढे संरक्षण देण्यात येईल.एक टॅक्टर जप्त असून दूसरा टॅक्टर जप्त करण्यात येणार आहे.आरोपींवर लवकरच कारवाई करण्यात येईल.
-डॉ.एस.शिवबाला,उपवनसंरक्षक,पूर्वभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com