लेकराच्या ओढीने 'तिने' सोडला दुसरा पती!

Baby-and-Mother
Baby-and-Mother

नाशिक - माय- लेकराच्या अतूट नात्याची विण ही घट्ट विणलेली असते; किंबहुना काही अपवाद वगळता त्यांच्यातील ताटातूट तशी अशक्‍यच. कौटुंबिक वादातून घरातील पती आणि मुलीला सोडून दुसऱ्याशी प्रेमविवाह करून गेलेल्या तरुणीची फरफट झाली. काही काळानंतर मुलीच्या आठवणीने व्यथित होऊन अखेर पुन्हा न जाण्याच्या निश्‍चयाने भरकटलेली ही माता आपल्या घराकडे परतली. एकीकडे लेकरू, पहिला पती आणि दुसरीकडे तिला नेण्यासाठी आलेला दुसरा पती... अशा द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या या तरुणीच्या कहाणीने पोलिसही चक्रावले आहेत. लेकरामुळे पुन्हा संसार जुळेलही; पण या साऱ्या प्रकारापासून अनभिज्ञ असलेला पहिला पतिराज आणि दुसऱ्या पतींचे काय, हा प्रश्‍न अनुत्तरीतच आहे. 

सातपूर परिसरातील एका तरुणीचे आपल्याच नातेवाइकाशी काही वर्षापूर्वी विवाह झाला. पण विवाहानंतर कौटुंबिक कलहामुळे वारंवार खटले उडत राहिले. अखेर पतीशी पटत नसल्याने तिने माहेरीच राहणे पसंत केले. पुढे त्याच भागात राहणाऱ्या चेन्नई येथील परप्रांतीय युवकाशी तिचे प्रेमसंबंध जुळले. प्रेमाच्या आणाभाका घेत हे दोघेही लग्नानंतर चेन्नईला गेले. तेथे तरूणीला भाषेची अडचण जाणवू लागली. त्याचबरोबर संसार करतांना दैनंदिन कसरत करणे तिला जिकरीचे ठरत होते. पण त्याचबरोबर तिला तिच्या लेकराची आठवण सारखी सतावत होती. अखेर तिने नाशिकला येण्याचा निर्णय घेतला. ती नाशिकला येऊन धडकली आणि आपल्या पहिल्या नवऱ्याबरोबर संसार करू लागली. 

अखेर प्रकरण गेले पोलिस ठाण्यात 
ती तकुणी चेन्नईला का येत नाही. हे पाहण्यासाठी तिचा पती नाशिकला आला तर त्याला भलतेच चित्र पहायला मिळाले. ती तरूणी आपला पती व मुलीबरोबर संसार करत असल्याचे दिसले. त्याने तिला चैन्नईला परत येण्याचा आग्रह धरला. पण तिने त्यास नकार दिला. अखेर हे प्रकरण सातपूर पोलिस ठाण्यात आले. त्या तरूणीने पोलिसांना आपली संपूर्ण कहाणी सांगत मुलीसाठी आपण चैन्नईहुन निघून आलो असून आता चैन्नईला जाण्याची इच्छा नाही. त्या पतीपासून आपली सुटका करण्याची विनंती केली.

पोलिसांनी तिच्या दुसऱ्या पतीला पोलिस ठाण्यात बोलावत विचारणा केली. त्यानंतर त्यानेही आपण रितसर लग्न केल्याची कागदपत्र सादर केले. दुसरीकडे पहिल्या पतीला तरूणीच्या दुसऱ्या विवाहाबद्दल काहीच माहित नव्हते. त्याने विवाह झाल्याचे ऐकल्यावर तोही चक्रावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com