'कलांगणा'त रेखाटले बाळासाहेब ठाकरे वस्तुसंग्रहालय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

अभिनेता इमरान हाश्‍मी सारखा दिसणाऱ्या नाशिकच्या सचिन ठाकरे या कलावंताने आपल्या कलागुणांचे सादरीकरण या व्यासपीठावर सादर केले. इमरान हाश्‍मीच्या गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करतांना चित्रपटातील डायलॉग म्हणत त्याने उपस्थितांची मने जिंकली.

नाशिक : वसंत ऋतुतील ऊर्जावर्धक सकाळच्या वातावरणात, कोकीळेच्या सुरेल आवाजाने प्रफुल्लीत झालेल्या वातावरणात चित्रकारांनी निसर्गाचे सुंदर रूप कॅनव्हासवर साकारले. औचित्य होते "सकाळ'तर्फे आयोजित केलेल्या "सकाळ-कलांगण' या उपक्रमाचे.

फोटो फीचर पाहण्यासाठी क्लिक करा

गंगापूररोडवरील स्व. बाळासाहेब ठाकरे वस्तुसंग्रहालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात चित्रकारांनी वस्तुसंग्रहालय व सभोवतालचे सौंदर्य रंग-रेषांतून टिपले. या कार्यक्रमास इतिहासाचे अभ्यासक गिरीष टकले, वस्तुसंग्रहालयाचे केअर टेकर शिंत्रे, "सकाळ'चे युनीट व्यवस्थापक राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

इमरान हाश्‍मी

अभिनेता इमरान हाश्‍मी सारखा दिसणाऱ्या नाशिकच्या सचिन ठाकरे या कलावंताने आपल्या कलागुणांचे सादरीकरण या व्यासपीठावर सादर केले. इमरान हाश्‍मीच्या गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करतांना चित्रपटातील डायलॉग म्हणत त्याने उपस्थितांची मने जिंकली.

वस्तुसंग्रहालयास भेट देतांना कलाप्रेमींना या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास अनुभवण्याची संधी छायाचित्र, शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून मिळाली. उत्साहपूर्ण वातावरणात आजचा कार्यक्रम पार पडला.

Web Title: balasaheb thackeray museum in sakal kalangan