हल्ल्याच्या निषेधार्थ पाळधीत कडकडीत बंद

हल्ल्याच्या निषेधार्थ पाळधीत कडकडीत बंद

जळगाव - सरपंच निवडीच्या वादातून धरणगाव तालुक्‍यातील पाळधी येथे मंगळवारी कासट यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामुळे गावात तणावाचे वातावरण असून या घटनेच्या निषेधार्थ आज गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना चौघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे ग्रामस्थांनी यासंदर्भात दोषींवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना आज देण्यात आले. 
 

धरणगाव तालुक्‍यातील पाळधी येथील सरपंचपदाच्या निवडीचा वाद विकोपाला पोचला आहे. ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पॅनेलचे प्रमुख राजीव पंढरीनाथ पाटील यांनी त्यांचे 8 सदस्य चार दिवसांपूर्वीच बाहेरगावी सहलीला पाठविले आहे. याच गटातील वैशाली पाटील आणि श्रीवर्धन नन्नवरे हे दोघे सदस्य सर्वांसोबत सहलीला गेले नव्हते आता दोन दिवसांपूर्वी तेही अचानक गायब झाले. दोघे सदस्य कासट यांच्या सांगण्यावरुन सहलीला गेल्याची खदखद दोन दिवसांपासून गावात सुरू होती. त्यावरून मंगळवारी सकाळी त्यांच्या घरावर हल्ला चढवला होता. पाळधी औटपोस्टाला याप्रकरणी 14 संशयितांसह 70 ते80 गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कडकडीत बंद 
मंगळवारी झालेल्या या हल्ल्याच्या घटनेने गावात तणावाचे वातावरण आहे. अशाप्रकारे गावात दहशत निर्माण करणे योग्य नाही, त्यामुळे घटनेच्या निषेधार्थ पाळधी गावातील व्यापाऱ्यांनी बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. विशेष म्हणजे सर्व व्यावसायिक या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. 

चार संशयिताना अटक 
हल्ल्याप्रकरणी शैला कासट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिस ठाण्याच्या पाळधी औटपोस्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील धर्मेश उर्फ विकी सुभाष कुंभार, अनिल भिका माळी, राजू नारायण पाटील, जितेंद्र भगवान पाटील यांना बुधवारी दुपारी अटक केली. मुख्य संशयीत अद्याप फरारच आहेत. त्यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी कासट यांच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन बुधवारी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात सादर करण्यात आले. 

माहेश्‍वरी समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 
पाळधी येथील माजी सरपंच व परिवारातील सदस्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व संशयितांवर कडक कारवाईची मागणी आज माहेश्‍वरी समाज बांधवांनी एकत्र येवून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सरंपचांना सरंक्षण देवून निवडणूकीतही सरंक्षण देण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी माजी सरपंच शरदचंद्र कासट, महापौर नितीन लढ्ढा, संजय बिर्ला, महाराष्ट्र माहेश्‍वरी समाजाच्या अध्यक्षा ज्योत्स्ना लाहोटी, विनोद बियाणी, दालमिल असोसिएशनचे प्रेम कोगटा, संजय तोतला, मनीष झवर, केदारनाथ मुंदडा, सौ.सुनिता चरखा, दत्तू लाठी, शाम बुतडा, हितेंद्र मुंदडा, राधेश्‍याम बजाज, साहेबराव पाटील, पी.पी.पाटील, मुकूंद नन्नवरे, चंद्रमणी नन्नवरे, राजमल सोमाणी, गोपाल कासट, देविदास पाटील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com