उर्जामंत्र्यांचे विजतारा भूमिगत करण्याचे महावितरणाला निर्देश

Mahavitaran
Mahavitaran

इंदिरानगर (नाशिक) : उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इंदिरानगर नागरी सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नागरे यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना पत्राद्वारे इंदिरानगर आणि राजीवनगर येथील विजतारा भूमिगत करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरे यांनी परिसरातील खंडीत विजपुरवठा तसेच विजेच्या तारा भुमिगत करणे याप्रश्नाबाबत समितीच्यावतीने आंदोलन तसेच स्वाक्षरी मोहिम राबवली होती. 
वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. तसेच शॉर्टसर्कीटमुळे टीव्ही, फ्रीज आणि इतर उपकरणे जळाल्याच्या घटनाही वारंवार घडल्या होत्या. तसेच विजेच्या तारा उघड्यावर असल्यानेही शॉर्ट सर्कीटच्या घटनाही वारंवार घडायच्या. याबाबत महावितरण तसेच बावनकुळे यांच्याकडे दाद मागण्यात आली होती. त्याची दखल घेत ऊर्जा मंत्र्यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने इंदिरानगर वासियांनी त्यांचे आभार मानले आहेत.  

एका उपनगरातील समस्येसाठी थेट ऊर्जामंत्र्यांनी लक्ष घालणे ही आनंदाची बाब आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता किमान मंत्र्यांच्या निर्देशांना मान्यता देत परिसरातील नागरिकांची या समस्येतून मुक्तता करावी अशी अपेक्षा आहे.
- मंगेश नागरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com