वडजीत 'ओंडका' टाकण्याची प्रथा हद्दपार!

wadjit
wadjit

भडगाव : 'जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळुनी टाका ' या केशवसुताच्या 'तुतारी' कवितेतील ओव्या सार्थ ठरवत वडजी ( ता. भडगाव) येथील तरूणांनी दिडशे वर्षांच्या परपंरा खंडीत केली आहे. अन् ' जग चंद्रावर अन वडजी वेशीवर' हा  गावाला लागलेला डाग पुसुन काढला आहे. आषाढ महिन्याच्या पहील्या मंगळवारी भंडार्याच्या दिवशी गावाच्या मुख्य प्रवेशद्वारातुन पुढील सव्वा महीन्यासाठी लाकडाचा ओंडका टाकण्याची प्रथा होती. गावाच्या या परीवर्तनवादि भुमिकेचे 'अंनिस' ने  कौतुक केले आहे.  

वडजी (ता.भडगाव ) येथे गेल्या दिडशे वर्षापासून आषाढ महीन्याच्या पहील्या मंगळवारी सव्वा महीन्यासाठी गावाच्या वेशीत लाकडाचा ओंडका टाकण्याची प्रथा प्रचलित होती. मात्र यंदा या चालत आलेल्या परपंरेला गावकर्यानी विशेषतः तरूणाईने तिलांजली दिली आहे. त्यामुळे दिडशे वर्षांनंतर पहील्यांदा गावाच्या वेशीत लाकुड पहायला मिळणार नाही. 

अशी होती प्रथा
खानदेशात आषाढ महीना लागला की, सर्वत्र भंडार्याना सुरवात होते. या महीन्याती मंगळवारी बोकडाचा बळी दिला जातो. पाहूण्यांची मांसाहारी जेवणासाठी आमंत्रित केले जाते. वडजी येथे आषाढ महीन्याच्या पहील्या मंगळवारी भंडारा साजरा केला जातो. भगताची गावातुन वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. भगत गावाच्या वेशीतुन निघाल्या बरोबर प्रवेशद्वारात लाकडाचा ओंडका टाकला जायचा. तर श्रावण महीन्याच्या पहील्या शुक्रवारी गावात रात्री लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम आयोजित केला जातो. तत्पुर्वी त्यादिवशी संध्याकाळी तमाश्यातील कलावंताची तगतरावावरून मिरवणूक काढली जाते. या तगतरावाची बैलगाडीच्या प्रवेशासाठी वेशीतील ओंडका काढला जायचा ही दिडशे वर्षापासूनची परपंरा सुरू सुरू होती.

परपंरेला विज्ञानाची जोड 
वडजीच्या या दिडशे वर्षापासून सुरू असलेल्या प्रथेला वैज्ञानिक आधार ही होता. पुर्वी आषाढ महीन्यात पावसाच्या झड्या असायच्या. त्यामुळे रोगराईच्या साथी लागयच्या म्हणून गावाच्या वेशीत लाकडाचा ओंडका टाकुन सव्वा महीने गावात बैलगाडी, गुरे यांना प्रवेशबंदि केली जायची. त्यामुळे  गावात रोगराई येणार नाही अशी भावना गावकर्याची होती असे जुने सांगतात. मात्र कालतंराने ही परंपरा फक्त वेशित लाकुड टाकण्यापुरतीच राहीली होती. इतर मार्गाने वाहने, बैलगाडी, गुरे आदिचा गावात प्रवेश व्हायला लागला. त्यामुळे जुन्यांच्या वैज्ञानिक कारणाला ही आधार उरला नाही. पुर्वी वेशितुन गाडी काढणार्याकडुन दंड ही वसुल करण्यात आले आहे. 

तरूणाईने परंपरा केली खंडीत 
आज आषाढ महीन्याचा पहीला मंगळवार असल्याने वडजीत भंडारा होता. नेहमीप्रमाणे गावातुन भगताची मिरवणूक काढण्यात आली. भगत वेशीतुन बाहेर पडल्यावर लाकुड टाकण्यासाठी काहीजण पुढे सरसावले.  मात्र तरूणांनी व काही ग्रामस्थांनी ओंडका टाकायला विरोध केला. दोघ गटांमधे आपसात बराचवेळ चर्चा चालली. अखेर लाकुड टाकुनये असे म्हणणारे अधिक असल्याने लाकुड न टाकण्याचे निर्णय झाला. त्यामुळे दिर्घ काळापासुन सुरू असलेली प्रथा खंडीत झाली. 'जग चंद्रावर जात असतांना गावाने वेशीत अडकुन राहणे योग्य नाही' अशी भुमिका तरूणाईने घेतल्याने ओंडका टाकण्यास यावर्षी विरोध करण्यात आला. तरूणाईच्या या लढ्याला अखेर यश आले. 

....आणि पुन्हा भंडारा झाला
8-10 वर्षापर्वी आजच्याप्रमाणेच काहींनी लाकुड टाकायला तिव्र विरोध झाला होता. त्यावेळी लाकुड टाकण्यात आले नाही . मात्र त्यानंतर परीसरातील इतर गावात पाऊस बरसला पण वडजीत योगायोगाने पाऊस झाला नाही. त्यामुळे गावकर्यानी लाकुड टाकण्याची परपंरा मोडली म्हणून मरीआईचा गावावर कोप झाला असा समज करत पुन्हा तिसर्या मंगळवारी गावाच्या वेशीत लाकुड टाकले. त्यानंतर कोणीही याप्रथेला विरोध केला नाही. पण यंदा या प्रथेला तिलांजली देण्याचा निर्णय गावकर्यानी घेतला आहे. 

वडजी येथील भंडार्याच्या प्रथा बंद करण्याबाबत अंनिस ने बर्याचदा प्रयत्न केले. पण ग्रामस्थांचा याला तिव्र विरोध होता. मात्र यंदा गावकर्यानीच स्वतः प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या निर्णयाचे मनापासून स्वागत आहे.
- डी.एस.कटारे जिल्हा कार्यवाह अंधश्रद्धा निर्मुलन समिती जळगाव  

वडजी ग्रामस्थांनी काळ्नुरूप बदल करून गावत वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा मोडकळीस आणण्याचे धारिष्ट दाखविल्याबद्दल अंनिस, जागृती मित्र मंडळ व केशवसुत ज्ञानप्रबोधनीकडुन मनापासून अभिनंदन. 
- प्रा. दिपक मराठे सचिव जागृती मित्र मंडळ भडगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com