भुजबळांच्या फार्म हाऊसवर 'एसीबी'चे पथक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

नाशिक - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाशिकमधील फार्म हाऊस आज (सोमवार) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधिकारी दाखल झाले.

छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसचे अँटी करप्शनकडून व्हॅल्यूएशन केले जाणार आहे. भुजबळ फार्म हाऊसचे एसीबीच्या पथकाकडून मोजमाप करण्यात येत आहे. मालमत्तेची मोजणी करण्यासाठी पाच जणांचे पथक दाखल झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, सरकार नियुक्त वास्तुरचनाकार, अभियंत्यांसोबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागेचेही विशेष पथक याठिकाणी आलेले आहे.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ सध्या मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. भुजबळ यांनी सत्तेचा वापर करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ‘ईडी‘ने हवाला प्रकरणात त्यांना अटक केली आहे. ते तुरुंगात असून त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे सत्र ‘ईडी‘च्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. मुंबई, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील औद्योगिक भूखंड, अकृषक जमीन, दुकाने आणि फ्लॅट अशा 22 मालमत्तांवर कारवाई करून ‘ईडी‘ने त्या जप्त केल्या आहेत.

Web Title: Bhujbal Farm House ACB team