विसर्जन मिरवणुकीत भुसावळमध्ये खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

भुसावळ - शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून झाल्याची घटना काल (ता. 5) रात्री घडली.

भुसावळ - शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून खून झाल्याची घटना काल (ता. 5) रात्री घडली.

ललित ऊर्फ विक्की हरी मराठे (वय 21, महात्मा फुलेनगर, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला मंडळातील सदस्य राजेंद्र ऊर्फ गोलू सुभाष सावकारे (तुळजापूर मंदिराजवळ, न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ) रस्त्याच्या पलीकडे घेऊन गेला. तेथे राजेंद्र सावकारे याने ललितच्या छातीवर धारदार शस्त्राने भोसकले. यात ललितचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित राजेंद्र पळून गेला. खुनाचे कारण स्पष्ट झाले नसले, तरी मुलीकडे वाईट नजरेने पाहात असल्याच्या कारणावरून हा प्रकार घडला असावा, असा कयास आहे. पोलिसांनी सावकारे याला आज सकाळी शिवपूर-कन्हाळा रोडवर अटक केली.