भुसावळमधील पारा तीन अंशांनी घसरला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

भुसावळ - दिवसेंदिवस विक्रमाकडे वाटचाल करणाऱ्या भुसावळच्या तापमानामध्ये आज तीन अंशांनी घट आल्याने नागरिकांनी सुस्कारा सोडला आहे. आज सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासात शहराचे तापमान कमाल ३९.५ अंश तर किमान २५.१ आणि आर्द्रता ४७.१ नोंदवण्यात आली. तर काल (ता. २) कमाल तापमानाची ४२.९ अंश नोंद झाली होती. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे आणि जोरदार वाऱ्यामुळे तीव्र तापमान सुसह्य होत आहे. 

दरवर्षी भुसावळला विक्रमी तापमानाची नोंद केली जाते. मात्र यंदा मार्चमध्येच ४० अंशांच्यावर पारा गेला आहे. मे मध्ये काय होणार याची चिंता शहरवासियांना भेडसावत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या तापमानापासून बचाव करण्यासाठी पांढरे रुमाल, टोपी, गॉगल, कुलर आणि शीतपेयांचा वापर वाढला आहे. दुपारी घराबाहेर पडणे नागरिक टाळू लागले आहेत. या दिवसापासून तर दुपारी रस्ते निर्मनुष्य दिसत होती. आज पारा घटल्याने शहरवासियांना हायसे वाटत आहे.

टॅग्स