भाजपच्या नेत्यांची उमेदवारांकडून वसुली; पैसे मागतानाचा व्हिडिओ व्हायरल

संपत देवगिरे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

नाशिक - भाजपमध्ये उमेदवारीसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या चर्चेला आज एका उमेदवाराने व्हायरल केलेल्या व्हीडिओमुळे पुष्टी मिळाली आहे. भाजप पक्ष कार्यालयात 'एबी फॉर्म' देतांना उमेदवारांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात असल्याचा हा व्हिडिओ आहे. पैसे देणाऱ्यालाच फॉर्म दिला जात असल्याने हा वादाचा विषय ठरला आहे. शिवसेनेपाठोपाठ भाजपच्या नेत्यांनीही आता स्वपक्षावरच उमेदवारीसाठी पैसे मागितल्याचा आरोप केल्याने राजकारण गढुळ झाले आहे.

भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची घोषणा 1 फेब्रुवारीला होणार होती. मात्र उमेदवारीचा घोळ शेवटपर्यंत सुरुच होता. शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप हे मनमानी करीत असल्याचा आरोप विविध नेत्यांनी आरोप केला होता. पालकमंत्र्यांनीही ही प्रक्रिया दोन दिवस लांबवल्याने उमेदवारीसाठी लाखोंची वसुली होत असल्याचे आरोप सुरु झाले. शेवटच्या दिवशी म्हणजेच ज्या दिवशी पदवीधर निवडणुकीचे मतदान सुरु होते त्यावेळी पक्षाचे कार्यकर्ते मात्र उमेदवारीच्या प्रतिक्षेत अडकून पडले.

पक्षाचा एबी फाॅर्म मिळण्यासाठी शहरातील दोन पदाधिकारी दोन लाख रुपयांची मागणी करीत होते. 'पैसे नसतील तर एबी फॉर्म मिळणार नाही', असे हे पदाधिकारी सांगत असल्याचा व्हिडिओ शुक्रवारी सायंकाळी यातील एका उमेदवाराने व्हायरल केला.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यंदा संलग्न महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळेतील एम. एस्सी. प्रवेशासाठी प्रथमच केंद्रीय...

02.18 AM

मालेगाव - पहिल्या पत्नीला तलाक दिला नसताना दुसरा बेकायदा निकाह करणाऱ्या औरंगाबाद येथील मजहर खान या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल...

01.27 AM

रुग्णवाहिका नाकारली; मृतदेह तहसीलसमोर नांदगाव - सततची नापिकी आणि व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्‍यातील चांदोरा येथील नामदेव...

बुधवार, 23 ऑगस्ट 2017