धुळ्यात ७२७ दात्यांचे विक्रमी रक्तदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

धुळे - शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त येथे आज झालेल्या महारक्तदान शिबिरात ७२७ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. धुळे शहरात पूर्वी झालेल्या शिबिरात शिवसेनेने विक्रमी ५४४ बाटल्या रक्तसंकलन केले. त्यानंतर आज त्याहून अधिक विक्रमी रक्तसंकलन झाले. यातून दात्यांनीही शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केल्याची माहिती जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी दिली.   

धुळे - शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त येथे आज झालेल्या महारक्तदान शिबिरात ७२७ दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. धुळे शहरात पूर्वी झालेल्या शिबिरात शिवसेनेने विक्रमी ५४४ बाटल्या रक्तसंकलन केले. त्यानंतर आज त्याहून अधिक विक्रमी रक्तसंकलन झाले. यातून दात्यांनीही शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केल्याची माहिती जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी दिली.   

शहरातील गल्ली क्रमांक सहामध्ये सकाळी साडेदहानंतर महारक्तदान शिबिर झाले. ते दात्यांच्या वाढत्या संख्येमुळे उत्तर महाराष्ट्रात विक्रमी ठरले. जिल्हाप्रमुख माळी यांच्या पुढाकाराने शिबिर झाले. संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. सहसंपर्कप्रमुख प्रा. शरद पाटील, ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, शिवआरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. माधुरी बोरसे, अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, लोकसभा संघटक भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, राजेंद्र पाटील, उपजिल्हाप्रमुख संजय गुजराथी, भूपेश शहा, कैलास पाटील, गंगाधर माळी, डॉ. सुशील महाजन, नितीन पाटील, परशुराम देवरे, तालुकाप्रमुख मनीष जोशी, विशाल देसले, दत्तू गुरव, महिला आघाडी कविता क्षीरसागर, वंदना पाटील, हेमा हेमाडे, युवासेनेचे ॲड. पंकज गोरे, उपशहरप्रमुख भगवान गवळी आदी उपस्थित होते. 

संपर्कप्रमुख थोरात म्हणाले, की ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण या सूत्रानुसार शिवसेना, शिवसैनिक काम करीत आहेत. रक्तदानासाठी रक्ताचे नाते पुढे येत नाही; परंतु यात शिवसैनिक हा कायम पुढे असतो. 
जिल्हाप्रमुख माळी म्हणाले, की दरवर्षी स्वत:च्या रक्तदानाचा विक्रम तोडण्याचे काम महारक्तदान शिबिरात होत असते. यंदाचे माझे ५१ वे रक्तदान आहे. महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्य सुनील बैसाणे यांनी सूत्रसंचालन केले. शिबिर यशस्वितेसाठी शेखर वाघ, रवींद्र माळी, पुरुषोत्तम जाधव, शंकर खलाणे, बेहेडचे सरपंच रावसाहेब गिरासे, आबा भडागे, देवराम माळी, संदीप चव्हाण, ललित माळी, संदीप सूर्यवंशी, देवा लोणारी, सुबोध पाटील, चंद्रकांत म्हस्के, वैभव भडागे, योगेश पाटील, महावीर जैन, सुधाकर पाटील, दिगंबर जाधव, पंकज मराठे आदींनी परिश्रम घेतले. 

मुस्लिमबांधवांचाही सहभाग
महारक्तदान शिबिरात मुस्लिमबांधवांची संख्या अधिक दिसून आली. शिबिरात सिव्हिल ब्लड बॅंक- २२५, नवजीवन ब्लड बॅंक- १७०, निर्णय जनसेवा ब्लड बॅंक- १०४, जीवनज्योती ब्लड बॅंक ८५, अर्पण ब्लड बॅंक- १०१, जवाहर फाउंडेशन ब्लड बॅंक- ४२, असे मिळून विक्रमी एकूण ७२७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Web Title: blood donation camp