माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करा : भारिपची मागणी

माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करा : भारिपची मागणी

निजामपूर-जैताणे (धुळे) : यंदा धुळे जिल्ह्यासह साक्री तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने माळमाथ्यासह साक्री तालुका दुष्काळी जाहीर करावा व परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी साक्री तालुका भारिप बहुजन महासंघाने तहसीलदार संदीप भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विशेषतः माळमाथा परिसरातील निजामपूर, जैताणे, भामेर, खुडाणे, रोजगाव, वाघापूर, वेहेरगाव, दुसाणे, बळसाणे, आखाडे, फोफादे, वाजदरे, वासखेडी, रुणमळी, वरसुस, डोमकानी, चिपलीपाडा, शिवाजीनगर, भडगाव आदी गावांमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान 20 ते 25 टक्क्यांहूनही कमी पाऊस झाल्याने शासनाने ही गावे दत्तक घ्यावीत, असेही निवेदनात नमूद केले आहे. परिसरातील नद्या-नाले कोरडेठाक पडले असून गुराढोरांचा चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जमिनीची पाणीपातळी खालावल्याने विहिरी व कूपनलिकाही आटल्या आहेत. रब्बी व उन्हाळी हंगाम येण्याची शक्यता मावळली आहे.

शासनाने नवीन विहिरी व बोअरवेल वरील करही तातडीने रद्द करावा अशी मागणी आहे. यंदा कांदे-कापूस आदी पिकेही जेमतेम 10 ते 15 टक्के हातात येण्याची शक्यता असून त्यांच्यावरही रोगराई पसरली आहे. कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शासनाने बागायत व कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा करून त्यांना सरसकट भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ तालुकाध्यक्ष नामदेव पिंपळे, जिल्हा उपाध्यक्ष गुलाब जगदेव, ओबीसी संघटनेचे तालुकाध्यक्ष पावबा देवरे, नाना जाधव, संतोष गोयकर, आबा सोनवणे, सुका चव्हाण, रवींद्र जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com