बोदवड तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

बोदवड - सुमारे सात लाखांच्या कर्जामुळे मुक्तळ (ता. बोदवड) येथे तरुण शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दहा दिवसांत तालुक्‍यातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे.

बोदवड - सुमारे सात लाखांच्या कर्जामुळे मुक्तळ (ता. बोदवड) येथे तरुण शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दहा दिवसांत तालुक्‍यातील ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे.

पोलिस सूत्रांनुसार, मुक्तळ येथील रहिवासी शिवदास भागवत (वय 35) याच्या आठ एकर शेतात कपाशी पेरलेली आहे. काही दिवसांपासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला असून, कपाशीचे उत्पादन आले नाही.

डोक्‍यावर विविध कार्यकारी सोसायटीचे 2 लाख 38 हजारांचे कर्ज, होम लोन 1 लाख 50 हजार व खासगी 3 लाख असे एकूण 6 लाख 88 हजारांचे कर्ज होते. त्यामुळे शिवदास कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळला होता. आज सकाळी शेतात गेल्यानंतर दुपारी घरी आला आणि शेजारी विलास पाटील यांना माझा शेवटचा राम राम घ्या... असे म्हणून घरात घुसताच चक्कर येऊन पडला. त्याच्या तोडातून फेस आल्याने लागलीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.