बोगस एजंटचा ‘आरटीओ’त राडा

RTO-Office
RTO-Office

जळगाव - शहरातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातून वाहन पासिंग करताना शासकीय फी न भरताच चॉइस नंबर मिळावा, यासाठी कथित माहिती अधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेच्या पदाधिकाऱ्याने गोंधळ घातल्याची घटना घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित एजंटविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंधळ घालणारा हा पदाधिकारी एका राजकीय नेत्याच्या संपर्कातील असल्याची माहिती समोर आली आहे. 

आरटीओ अधिकारी आणि कार्यालयातील अनधिकृत व्याख्येत मोडणाऱ्या एजंटचा वाद नेहमीचा आहे. अधिकाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ करण्यापासून ते अंगावर धाऊन जात मारहाण करण्यापर्यंत गुंड एजंटने मजल गाठली आहे. शासकीय नियमावर बोट ठेवताच एजंट लॉबी सक्रिय होते. सोयीप्रमाणे नियम व कायद्यांचा वापर करावा असाच कल असतो. आजही झाले तसेच, आरटीओ कार्यालयात एजंटचे काम करणारा शैलेश काशिनाथ सपकाळे (रा. चौगुले प्लॉट) हा नव्या वाहनाच्या पासिंगसाठी कागदपत्रे घेऊन करवसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांच्या टेबलावर आला. वाहनाचा पसंतीचा नोंदणी क्रमांक (चॉईस नंबर)साठी त्याने इंगळेंना गळ घातली. मात्र, नियमप्रमाणे पावती फाडून घेण्याचा सल्ला इंगळेंनी दिला. त्यावरून वाद होऊन शैलेश सपकाळे याने शिवीगाळ करून टेबलावर हात पटकत, शिवीगाळ दमदाटी करून हात पाय तोडून टाकण्याची धमकी दिल्याची तक्रार इंगळेंनी रामानंदनगर पोलिसांत दिली आहे.

कार्यालयात ‘दबंगगिरी’ 
रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीतील संशयित शैलेश सपकाळे हा केंद्रीय भ्रष्टाचार निर्मूलन पक्षाचा जिल्हाध्यक्ष तथा माहिती अधिकार संघटनेचा शहर संघटक असल्याचे ओळखपत्र दाखवून आरटीओ कार्यालयात ‘दबंगगिरी’ करीत असल्याच्या तक्रारी असून, करवसुली अधिकारी चंद्रशेखर इंगळे यांच्याशी गेल्या तीन-चार दिवसांपासून वाद सुरू असल्याची माहिती सामोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com