‘मेक इन नाशिक’ उपक्रमात महापालिकेकडून सुविधांचे ब्रॅन्डिंग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नाशिक - आल्हाददायक हवामान असलेल्या नाशिकमध्ये उद्योगांमधील गुंतवणूक वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मेक इन नाशिक’ उपक्रमात महापालिका सहभाग नोंदविणार आहे. मुंबईतील उपक्रमात महापालिकेतर्फे स्टॉल उभारणी होणार असून, त्यात पाणीपुरवठ्यापासून ते घनकचरा संकलन प्रकल्पांची माहिती दिली जाणार आहे. पायाभूत नागरी सेवांचे भक्कम जाळे नाशिकमध्ये असल्याने उद्योगांना साद घातली जाणार आहे.

३० व ३१ मेस ‘मेक इन नाशिक’ परिषद मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये होत आहे. त्यात उद्योगांसाठी पाणी, जमीन, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने नाशिक कसे पोषक आहे, याचे सादरीकरण विविध संस्थांमार्फत केले जाणार आहे. त्यात महापालिकेकडून स्टॉल लावला जाणार आहे. त्यात शहराची पूर्ण माहिती सादर केली जाणार आहे. शहरात घंटागाड्या किती, घनकचरा संकलन कसे केले जाते, रस्त्यांचे जाळे, पाण्याची उपलब्धता, जमिनीची उपलब्धता, भौगोलिक दृष्टीने नाशिकचे मुंबई, पुणे, सुरत व औरंगाबादच्या मध्यभागी असलेले स्थान याबाबतचे सादरीकरण होईल. वनौषधी उद्यान, शस्त्र संग्रहालय, वाहतूक बेटे, वॉटर कर्टन वॉल, धार्मिक महत्त्व, स्मार्टसिटीमध्ये अंतर्भूत केलेल्या प्रकल्पांची माहिती दिली जाणार अाहे.