जळालेल्या नोटांवर नंबर असल्यास मिळणार बदलून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

पीडित कुटुंबीयांसाठी करनकाळ, परदेशींचा बॅंकेकडे पाठपुरावा; विवाह सोहळ्याचा प्रश्‍न

धुळे - शहरातील ऐंशी फुटी रोडवरील रमजानबाबानगरमध्ये बुधवारी (ता. १) पहाटे अडीचला लागलेल्या आगीत कष्टकऱ्यांची आठ ते दहा घरे खाक झाली. त्यात एका कुटुंबाची विवाह सोहळ्यासाठी जमविलेली तीन लाखांची रोकड जळाली. संकटातील त्या पीडित कुटुंबाच्या मदतीला काँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज करनकाळ, आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेशसिंह परदेशी सरसावले आहेत. त्यांनी बॅंकेच्या मदतीने नोटा बदलून मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या सहकार्याने पीडित कुटुंबांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी श्री. करनकाळ यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याकामी पोलिस निरीक्षक परदेशी यांच्यासह पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही सहकार्य लाभत आहे. 

बॅंकेशी संपर्क
आगीत पीडित कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, घरपट्‌टी भरल्याची पावती, बॅंकेचे पासबुक, शालेय साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, एकाचे विवाह व साखरपुड्यासाठी खरेदी केलेले साहित्य खाक झाले. यात शफीक आणि रुकसाना या भावा-बहिणीचा विवाह ठरला आहे. त्यांची साहित्य खरेदी सुरू होती. त्यांनी बॅंकेतून दोन लाखांची रोकड काढून आणली, तर लाख रुपये घरात जमविले.

अग्नितांडवात ही तीन लाखांची रोकड खाक झाली. त्यामुळे त्यांचा विवाह सोहळा कसा करायचा, या विवंचनेत कुटुंबीय आहेत. शासकीय यंत्रणेने पंचनामा केला. असे असताना श्री. करनकाळ यांना ही माहिती मिळाली. त्यांनी श्री. परदेशी व महसूल यंत्रणेच्या मदतीने पीडित भावा-बहिणींच्या विवाहासाठी जमविलेले पैसे उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जळालेल्या नोटांवर नंबर दिसत असेल, तर अशा नोटा बदलून मिळतात. त्यानुसार श्री. करनकाळ यांनी स्टेट बॅंकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, आझादनगर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांच्या मदतीने योग्य त्या कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर जळालेल्या परंतु नंबर असलेल्या नोटा बॅंकेकडे सुपूर्द केल्या जातील. त्या नागपूर येथे पाठविल्या जातील. तेथे बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी तपासणी करतील. नंतर नोटा बदलून देतील. या प्रयत्नातून पीडित कुटुंबाला सुमारे ७० ते ८० हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून मिळण्याची शक्‍यता असल्याचे श्री. करनकाळ यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्र

निजामपूर-जैताणे(धुळे) : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निजामपूर येथील ग्रामपंचायत सभागृहात बोलाविण्यात आलेल्या ग्रामसभेत...

10.33 AM

पिलखोड(ता. चाळीसगाव) : बिबट्याने सलग दोन दिवसात तीन हल्ले केल्याची घटना काकळणे(ता. चाळीसगाव) आणि सायगाव(ता. चाळीसगाव) परिसरात...

10.28 AM

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकाणी शिवारातील गेल्या वर्षी फुटलेले घटबारी धरण खुडाणे (ता.साक्री) येथील...

09.18 AM