सत्यजित तांबे यांच्या नियुक्तीनंतर सटाण्यात जल्लोष

सत्यजित तांबे यांच्या नियुक्तीनंतर सटाण्यात जल्लोष

सटाणा : महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांचा भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल आज शुक्रवार (ता. १४) रोजी बागलाण तालुका कॉंग्रेस कमिटी व बागलाण तालुका युवक कॉंग्रेसतर्फे फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून एकच जल्लोष करण्यात आला. 

अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून लोकशाही पद्धतीने पक्षातील सर्व पदांची निवडणूक होत असते. राज्यभरात ९, १० व ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकांच्या कामकाजासाठी निवडणुक अधिकारी म्हणून दिल्लीतील कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या निवडणुकीत सत्यजित तांबे यांनी ७०१८९ मतांनी मोठा विजय मिळविला. त्यांच्या निवडीचे वृत्त सटाणा शहर व तालुक्यात येऊन धडकताच समर्थक व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. येथील पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांच्या हस्ते चार फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर साठ फुटी रस्त्यावरील पाटील यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत पेढे वाटून तांबे यांचा विजयाचा जल्लोष केला. 

यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन कोठावदे, प्रदेश सचिव मिलिंद चित्ते, जिल्हा सचिव यशवंत पवार, तालुकाध्यक्ष अरुण नंदन, तालुका सचिव सचिन सोनवणे, महेश भदाणे, स्वप्नील खैरनार, पवन जाधव, उदय सोनवणे, ललित ठाकरे, शाहरुख शेख, सिराज मुल्ला, विशाल सोनवणे, करण देवरे, निखिल कासारे, वैभव सोनवणे, पियूष गांगुर्डे, ओम सोनवणे, आकिब शेख, शोएब शेख, रिजवान सय्यद, बबलू शेख, सुजित बिरारी, समीर धोत्रे, गौरव पवार, आकाश खैरनार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com