नरेंद्र दराडेंच्या विजयाची चार तास निघाली जंगी मिरवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

येवला :  जिल्ह्यात माझे पक्षासह जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक सहकारी मित्र असून या सर्वांनी पक्षभेद विसरून मला सहकार्य केल्याने याचा फायदा मला विधानपरिषद निवडणुकीत झाला आहे.स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,उपनेते संजय राऊत,राज्यमंत्री दादा भुसे व सर्व पदाधिकार्यांनी केलेल्या अपार प्रयत्नाचा देखील माझ्या विजयात सिंहाचा वाटा आहे,असे प्रतिपादन नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी केले. 

येवला :  जिल्ह्यात माझे पक्षासह जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक सहकारी मित्र असून या सर्वांनी पक्षभेद विसरून मला सहकार्य केल्याने याचा फायदा मला विधानपरिषद निवडणुकीत झाला आहे.स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,उपनेते संजय राऊत,राज्यमंत्री दादा भुसे व सर्व पदाधिकार्यांनी केलेल्या अपार प्रयत्नाचा देखील माझ्या विजयात सिंहाचा वाटा आहे,असे प्रतिपादन नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य नरेंद्र दराडे यांनी केले. 

निकालानंतर आज सायंकाळी येथील दराडे यांचे येथील विंचूर चौफुलीवर आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.प्रारंभि चौफुलीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शिवसेना नेते संभाजी पवार,तालुका प्रमुख रतन बोरणारे,उपजिल्हा प्रमुख वाल्मिक गोरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी,भास्कर कोंढरे,माजी नगराध्यक्ष पकज पारख,नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,उपनगराध्यक्ष सुरज पटणी,नगरसेवक अजय जैन आदींसह शिवसेना पदाधिकारी व समर्थकांची उपस्थिती होती.

यानंतर शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत समर्थक व कार्यकर्ते जय भवानी जय शिवाजी,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन हातात भगवे झेंडे घेऊन नाचत होते.फटाक्यांची जोरदार आतषबाजी,डीजेचा जोरदार आवाज आणि हलकडीचा निनादात संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेणारी ही मिरवणूक ठरली.शनीपटांगनातील शिवसेना कार्यालयात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.यावेळी बोलतांना संभाजी पवार यांनी दराडे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास सार्थ केल्याची प्रतिक्रिया दिली.यावेळी अरुण काळे,रतन बोरनारे,डॉ.सुधीर जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले.

ही मिरवणूक कापड बाजारातून सराफ पेठेतून जाऊन टिळक मैदानावर मिरवणुकीचा जल्लोषात समारोप करण्यात आला.मिरवणुकीत सजवलेल्या वाहनावर भगवा फेटा परिधान करून दराडे यांच्यासह शिवसेनेचे नेते संभाजी पवार व माजी नगराध्यक्ष रामदास दराडे हे मिरवणुकीत दरम्यान उभे होते.मिरवणूक मार्गावर घरोघरी जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे तसेच युवानेते कुणाल दराडे यांचा नागरिकांनी शाल देऊन तसेच फेटा बांधून सत्कार केला.मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे,सुनील पाटील,सुनील हाडगे,बाजार समितीचे माजी सभापती सुधीर जाधव,मर्चंट बँकेचे संचालक अरुण काळे,मनीष काबरा,नितीन काबरा,नगरसेवक दयानंद जावळे,गणेश शिंदे,दिनेश आव्हाड,सुधीरकुमार गुजराथी,पोपट आव्हाड,डॉ.राजेश पटेल,रुपेश दराडे,दत्तात्रय वैद्य,राहुल गुजराथी,सुहास भांबारे,राहुल लोणारी आदि मोठ्यासंख्येने सहभागी होते.

Web Title: celebration of success in election for 4 hours