मध्यवर्ती कारागृहात कैद्याच्या डोक्‍यात वीट मारून खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

नाशिक रोड - कानटोपी देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्‍यात वीट मारून त्याचा खून केल्याचा प्रकार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घडला. या प्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला.

नाशिक रोड - कानटोपी देण्यास नकार दिल्याच्या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोक्‍यात वीट मारून त्याचा खून केल्याचा प्रकार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात घडला. या प्रकरणी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला.

आजारी असल्याने तानाजी मारुती माने (वय ७०) हा कैदी कारागृहाच्या रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या बाजूलाच सचिन कन्हैया टावरे हाही उपचार घेत होता. टावरे याने मानेकडे थंडी वाजते म्हणून कानटोपी मागितली. मात्र, माने याने कानटोपी देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने टावरेने जवळ असलेली वीट घेऊन मानेच्या डोक्‍यात मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. परिणामी मानेला तातडीने अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना माने मरण पावला. मृत माने हा बलात्काराच्या गुन्ह्याखाली कारागृहात शिक्षा भोगत होता, तर टावरे चोरीच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. या घटनेनंतर कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक रोड पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. याबाबत खुनाचा गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय देशमुख तपास करीत आहेत.

दरम्यान, कारागृहातील रुग्णालयात वीट कोठून आली, याचा पोलिस शोध घेत आहे. कैदी या वस्तूंचा हल्ल्यांसाठी वापर करत असल्याने दगड, फरशाचे तुकडे, विटा  तेथून हलविल्या जातात. कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा या घटनेने पुन्हा प्रकाशझोतात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकावर उद्या (ता. 25) सहा तासांचा, तर अंबरनाथ स्थानकावर साडेचार तासांचा मेगा ब्लॉक असल्याने...

02.48 AM

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात आज पहाटेपासून दिवसभर आर्द्रा नक्षत्राच्या संततधारेने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे...

02.03 AM

मनमाड : येथील मालेगाव चौफुली भागात काल (ता. 23) रात्री पोलिसांनी इनोव्हा गाडीतून तब्बल एक कोटी 98 लाख 23 हजार 800 रुपयांच्या नवीन...

01.03 AM