निमंत्रण पत्रिकेवरून वाद; भाजपची बैठक रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उद्याच्या (रविवार) दौऱ्याच्या नियोजनासाठी आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) बैठकीमध्ये गटबाजीचे उघड प्रदर्शन झाले. या दौऱ्याच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव खाली घेतल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आयोजनाच्या बैठकीतच गदारोळ घातला आणि खुर्च्यांची फेकाफेक केली. यामुळे ही बैठकच रद्द करावी लागली.

मुख्यमंत्री फडणवीस उद्या जिल्ह्यातील जामनेर येथे एका कार्यक्रमासाठी येत आहेत. जामनेर हा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत केलेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी त्यांनी मुख्यमंत्री येत आहेत.

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे नाव खाली घेण्यात आले आहे. त्यामुळे दौऱ्याच्या नियोजनाच्या बैठकीत खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळी खडसे आणि गिरीश महाजन दोघेही उपस्थित होते. पण कार्यकर्त्यांनी दोघांचेही ऐकले नाही. यामुळे अखेर ही बैठक रद्द करावी लागली.