सनदी लेखापालांची भारतात कमतरता - अग्रवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

नाशिक -  विकासाच्या वाटेवर चाललेल्या भारताला सनदी लेखापालांचा आज मोठी उणीव जाणवत आहे. व्यापाऱ्याला आर्थिक शिस्त लावण्यासाठी, तसेच करसंकलनात वाढ होण्यासाठी दुप्पट सनदी लेखापालांची गरज आहे. डिजिटल अर्थव्यवस्थेचे सुकाणू हे सीएंच्या हाती राहणार असल्याचे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष उत्तम अग्रवाल यांनी शनिवारी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाच्या नाशिक शाखा आणि विद्यार्थी संघटनेच्या वतीने सीएच्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय परिषदेला आज सुरवात झाली. परिषदेचे उद्‌घाटन युवा जलतरणपटू भक्ती शर्मा यांच्या हस्ते झाले. अग्रवाल म्हणाले, 'चार्टर्ड अकाउंटंट्‌स हा एकमेव असा व्यवसाय आहे, की ज्यात सकारात्मक ऊर्जा आहे. जागतिक पातळीवर "सीएं'साठी भरपूर संधी उपलब्ध आहेत. भारतात आजमितीस दोन लाख 40 हजार सनदी लेखापाल असून, 27 हजार सनदी लेखापाल परदेशात कार्यरत आहेत; परंतु त्यात वाढ होणे गरजेचे आहे.''

सनदी लेखापाल सुनील गाभावाला यांनी नवीन येणारा वस्तू व सेवाकर कायदा (जीएसटी) हा व्यापाऱ्यांच्या हिताच्या असल्याचे नमूद केले. सनदी लेखापालांना लेखापरीक्षणावेळी कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारांची माहिती उघड होत असेल, तर त्यांनी ही बाब आपल्या लेखापरीक्षण अहवालात नमूद करून भागधारकांच्या निदर्शनास आणून देणे अनिवार्य आहे. एक कोटीपेक्षा अधिक मूल्याच्या गैरव्यवहारांची माहिती केंद्र सरकारला कळविणे गरजेचे असल्याचे विजय जालानी यांनी स्पष्ट केले.

उत्तर महाराष्ट्र

जळगाव : 'त्या आठही प्रवाशांचा जीव वाचवता आला असता, तर शौर्याचा आनंद साजरा केला असता..' अशा शब्दांत अमरनाथ यात्रेत दहशतवादी...

04.39 PM

जेलरोड (नाशिक) - "मातीच्या ढिगाऱ्याला कधी कोणी नमस्कार करतांना पाहिले आहे का?किंवा रस्त्यामध्ये पडलेली माती पायदळी तुडवली गेली...

04.12 PM

नाशिक - ऋषिमुनींची तपोभूमी, सिद्धांची योगभूमी, फुलांच्या मुबलक आवकेमुळे गुलशनाबाद, यात्रेकरूंचं (पिलग्रीम), द्राक्ष (...

01.24 PM