कधी येवल्याला येतोय असं झालंय! - छगन भुजबळ

Chhagan-Bhujbal
Chhagan-Bhujbal

येवला - येवला म्हणजे भुजबळ यांचे होमपीच. या दुष्काळी मतदारसंघाला नवा आकार देण्याचे काम छगन भुजबळ नावाच्या नेत्याने केले आहे. त्यामुळे येवलेकरांना आपला नेता आपल्या होमपीचवर कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. भुजबळांनाही येवलेकरांच्या भेटीची आस लागली असून, सोमवारी (ता. ७) भेटण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधी येवल्याला येतोय, असं झालंय या शब्दांत आपल्या भावना 
व्यक्त केल्या.

१७ जानेवारी २०१६ या दिवशी भुजबळ येवल्यात तब्बल आठ तास तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसह समस्या जाणून घेतल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर महिनाभर ते परदेशात फिरण्यासाठी गेले होते. तेथून आल्यावर चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला आणि ते आपल्या मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत. त्यानंतर १६ मार्चला अटक झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून अधिकृत रविवारी (ता. ६) सुटका झाली. असे असले, तरी त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने ते रुग्णालयातच उपचार घेत असून, अजून घरीदेखील गेलेले नाहीत.

तब्बल २८ महिन्यांपासून आपल्या मतदारसंघात न फिरकलेले आपले लाडके आमदार आपल्या भेटीला केव्हा येतील, याची उत्सुकता येवलेकरांना आहे. तशी ती भुजबळांनादेखील असल्याचे सोमवारी (ता. ७) समोर आले आहे. येथील युवानेते सुनील पैठणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगरसूलचे माजी सरपंच सुभाष निकम, अनिल निकम आदींनी सोमवारी केईएम रुग्णालयात भेट घेतली, तेव्हा भुजबळांनी मला केव्हा येवल्याला येईल, असं झालं असल्याचे भावनिक उद्‌गार काढले. त्यामुळे तब्येतीत सुधारणा होऊन न्यायालयाकडून रीतसर परवानगी मिळताच भुजबळ मतदारसंघाच्या भेटीला येतील, हे नक्की आहे. तसे तर वयाच्या पंचाहत्तरीतही भुजबळांनी आपले मतदारसंघावरील प्रेम तसूभरही कमी होऊ दिलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com