द्राक्षमणी फुगवणीवर थंडीचा परिणाम 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

नाशिक - जिल्ह्यात गत सप्ताहापासून 10 अंश सेल्सियसच्या खाली तापमान आहे. त्यामुळे या कडाक्‍याच्या थंडीचा आता द्राक्षबागांना सामना करावा लागत असून, पक्वतेच्या टप्प्यात असलेल्या द्राक्षांच्या मण्यांची आकारवाढ थांबली आहे. वेल सुप्तावस्थेत गेल्याने अन्नद्रव्यांचे वहन थांबले असल्याने द्राक्ष उत्पादकांसमोरील चिंता वाढली आहे. यातच काही भागात भुरीचा प्रादुर्भावही वाढला असल्याने त्याच्या नियंत्रणासाठीही द्राक्ष उत्पादकांना खर्च करावा लागत आहे. या वाढत्या थंडीचा रब्बीतील गहू, हरभरा यांना चांगलाच फायदा होत आहे.

नाशिक - जिल्ह्यात गत सप्ताहापासून 10 अंश सेल्सियसच्या खाली तापमान आहे. त्यामुळे या कडाक्‍याच्या थंडीचा आता द्राक्षबागांना सामना करावा लागत असून, पक्वतेच्या टप्प्यात असलेल्या द्राक्षांच्या मण्यांची आकारवाढ थांबली आहे. वेल सुप्तावस्थेत गेल्याने अन्नद्रव्यांचे वहन थांबले असल्याने द्राक्ष उत्पादकांसमोरील चिंता वाढली आहे. यातच काही भागात भुरीचा प्रादुर्भावही वाढला असल्याने त्याच्या नियंत्रणासाठीही द्राक्ष उत्पादकांना खर्च करावा लागत आहे. या वाढत्या थंडीचा रब्बीतील गहू, हरभरा यांना चांगलाच फायदा होत आहे. तसेच, या वर्षी कांद्याची लागवड तुलनेने कमी असली तरी या थंडीबरोबर बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने कांद्यालाही ही थंडी पोषक ठरत आहे. वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी केले आहे. 

टॅग्स

उत्तर महाराष्ट्र

पिलखोड (ता. चाळीसगाव) : कन्नड घाट परिसरात रविवारी(ता. 20) सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे सायंकाळी आठच्या सुमारास दरड कोसळली होती...

09.36 AM

जरंडी - दुष्काळी परिस्थितीतही शेतीची कास न सोडणाऱ्या शेतकऱ्यांचा व त्यांना साथ देणाऱ्या सर्जाराजाचा सन्मान करण्याचा अनोखा उपक्रम...

08.33 AM

धुळे - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जून 2016 ला थकबाकीदार असलेल्या शेतकर्यांना कर्जमाफीसाठी तसेच 2016 मध्ये...

08.33 AM